जतमध्ये एकजण कोरोना पॉझिटिव्ह | संपर्कातील साखळी मोठी ; शोध सुरू

0

जत,प्रतिनिधी : जत शहरातील शेगाव रोडला राहणाऱ्या व खलाटी येथील रुग्णाच्या संपर्कातील एकाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जतेत खळबळ उडाली आहे.

जत शहरातील हा पहिला रुग्ण आहे.

Rate Card

खलाटीतील रुग्णाच्या संपर्कातील पाच जणाचे स्वाब गुरूवारी तपासणीसाठी घेण्यात आले होते.त्यातिल एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.तर अन्य चार जणाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. बाधित व्यक्ती ट्रँव्हलवर चालक होता.तर खलाटीतील कोरोना बाधित व्यक्ती त्याचा मदतनीस म्हणून काम करत होता.चालक व मदतनीस यांनी कोलकता येथे प्रवास केला होता.तेथून आल्यानंतर जत शहरात तो फिरल्याची चर्चा आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.