कोरोनाचा दणका : बोगस डॉक्टर गायब
जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात भाबड्या जनतेच्या जिवाशी खेळत दुकानदारी थाटलेले बोगस डॉक्टर कोरोनाचा प्रभाव स्पष्ट होताच गायब झाले आहेत.यात बंगालमधून आलेले तालुक्यात मोठ्या प्रमाणात बोगस डॉक्टर तालुक्यात कोणत्याही आजारावर बेधडक उपचार करत होते.अनेकवेळा कारवाया होऊनही हे डॉक्टर पुनः पुन्हा दवाखाने थाटत होते मात्र गेल्या अडीच महिन्यापासून हे बंगालस्थित बोगस डॉक्टर गायब झाल्याचे चित्र आहे. सध्या अधिकृत परवाना असलेल्या डॉक्टराशिवाय उपचार करण्यास मनाई आहे.त्यामुळे बोगस डॉक्टरांचा धंदा कोणत्याही कारवाई शिवाय बंद पडला आहे.
