जत नगरपरिषद हद्दीतील कामे रखडविणाऱ्या ठेकेदारांना ब्लँक लिस्टमध्ये टाका : विजय ताड

0

जत,प्रतिनिधी : जत शहरात नगरपरिषदेच्या वतीने चालू असलेली विविध विकास कामे चालू आहेत.यासाठी शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो.ही कामे वेळेत पूर्ण होत नाहीत तसेच त्याचा दर्जाहीन व निकृष्ट आहे.आशा निकृष्ट व दर्जाहीन कामे करणाऱ्या ठेकेदारांना ब्लॅक लिस्ट मध्ये टाकावे, यासाठी जिल्हाधिकारी यांना लवकरच भेटून निवेदन देणार असल्याची माहिती जत नगरपरिषदेचे विरोधी पक्ष नेते विजय ताड यांनी दिली.

जत नगरपरिषदेकडे सध्या काँक्रीट गटारी, काँक्रीट रस्ते,डांबरी रस्ते, लाईटची खांब उभे करणे, स्वच्छताचा ठेका कर्मचारी पुरवठा करणे असे विविध जत नगरपरिषदेचे ठेके चालू आहेत. जत नगरपरिषद स्थापन होऊन अनेक वर्षे झाली आहेत. तरीही जतच्या वैभवात भर पडेल अशी कोणतीच कामे या नगरपरिषदेकडून झाली नाहीत.गेल्या आठ वर्षात नगरपरिषद फक्त भांडणे आणि घोटाळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. त्यात आणखी भर म्हणजे दर्जाहीन कामे करणाऱ्या ठेकेदारांची फक्त मलई खाण्या व्यतिरिक्त या नगरपरिषदेत दुसरी कोणतीच कामे होत नाहीत. यावर कोणाचेही नियंत्रण नाही.याची निरीक्षण, तपासणी पण कोणी करत नाही. यामधून शासनाची कोट्यावधीची फसवणूक

केली जात आहे.आताही मोठ्या प्रमाणात टेंडर झालेली काम रखडली आहेत.अशा वेळेत कामे पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांची नावे काळ्या यादीत समाविष्ट करून त्यांचा ठेका कायमस्वरूपी रद्द करावा

Rate Card

झालेल्या कामांची गुणवत्ता विभागाकडून तपासणी व्हावी,अशी मागणी ताड यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.