खलाटीतील रुग्णाच्या संपर्कातील 35 जण विलगीकरण कक्षात | जवळच्या संपर्कातील पाच जणाचे आज स्वाब घेणार : जतेत साखळी वाढणार

0

जत,प्रतिनिधी : खलाटी ता.जत येथे कोरोना बाधित रुग्ण सापडताच आरोग्य विभागाकडून खबरदारी घेत या रुग्णाच्या संपर्कातील 35 जणांना जत येथील कोविड सेंटरमध्ये विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यातिल जवळचे संपर्क आलेल्या जतमधील दोन,खलाटीतील तिघे अशा पाच जणाचे आज स्वाब घेण्यात येणार असल्याची माहिती डफळापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजीत चौथे यांनी दिली.

मुळ खलाटी येथील व खाजगी ट्रँव्हलवर मदतनीस असलेल्या 65 वर्षीय व्यक्तीचे कोरोना बाधित रिपोर्ट येताच एकच खळबळ उडाली आहे.जत शहरात राहत असलेला हा कोरोना बाधित व्यक्ती एका ट्रँव्हलवर मदतनीस म्हणून काम करत होता.त्यांने कोलकत्ता,राजस्थान, नागपुर,पुणे,मुंबई असा प्रवास केल्याचे समोर आले आहे.त्यादरम्यान त्यांच्या संपर्कात कितीजण आले याचा शोध घेतला जात आहे.

सध्या त्यांच्या सोबतचे दोन ट्रँव्हल डायव्हर,तीन नातेवाईक जवळच्या संपर्कात आल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर या सर्वाशी 30 जणांचा संपर्क झाल्याने त्यांनाही दक्षता म्हणून जत येथील कोविड सेंटर येथे विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.सध्या डफळापूर प्राथमिक आरोग्य केंद्राची विविध पथके खलाटीत तैनात करण्यात आली आहेत. गावाच्या सिमा बंद करण्यात आल्या आहेत. गावात औषध फवारणी करण्यात आली आहे. आजपासून गावातील सर्व नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे.

Rate Card

ग्रामस्थाच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला

कोरोना बाधित रुग्णांची तब्येत बिघडल्याने त्याला जत येथील घरी सोडण्यात आले होते.तेथे त्यांच्या नातेवाईकांनी जत येथील ग्रामीण रुग्णालयात दाखविले होते.तेथे प्राथमिक तपासणी करून त्याला सर्दी,तापाची औषधे देऊन घरी पाठविले होते.तेथून ते थेट खलाटी येथे आले.तेथील संरपच यांना माहिती मिळताच त्यांनी गावातील शाळेत त्याला क्वॉरंटाईन करत डफळापूरच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधला.डफळापूर आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अभिजीत चौथे यांनी खलाटी गाठत त्यांची लक्षणे पाहताच त्याला मिरजला हलविण्याचा निर्णय घेतला.त्यांनी वेळीच दक्षता घेतल्याने मोठा अनर्थ टळला.अन्यथा खलाटीतील काही लोंकाचा संपर्क आला असता.दुसरीकडे ग्रामीण रुग्णालयात दक्षता न घेतल्याने या रुग्णा सोबत साखळी वाढली आहे.पाच जणांच्या रिपोर्टनंतर जत शहरात किती प्रमाणात कोरोनाचा फैलाव झाला आहे हे स्पष्ट होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.