आंवढीतील बाधित रुग्णाच्या संपर्कातील 17 जणांचे संस्थात्मक विलगीकरण
जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील आंवढी येथे तिघेजण कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आहे.त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.आरोग्य विभागासह संपूर्ण प्रशासन खडबडून जागे झाले आहे. संपूर्ण गाव सीलबंद केले आहे.बाधित रुग्णाच्या संपर्कातील 17 लोकांना प्रशासनाने जत येथे संस्थात्मक विलगीकरण केले आहे. या सर्वांचेही स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत.अशीलमाहिती तहसीलदार यांना सचिन पाटील यांनी दिली.

मुंबईहून आंवढी येथे आलेल्या तिघेजण कोरोना बाधित झाले आहेत.मुंबईच्या पनवेल येथे खाजगी नोकरी करत असलेले दोघे भाऊ दुचाकीवरून आंवढीत आले होते.आल्यानंतर त्यांना होम क्वॉरंटाईनमध्ये राहण्याच्या सुचना दिल्या होता.तरीही त्यांच्या जवळच्या संपर्कात आलेल्या आंवढी येथील 9 जण व शेगाव येथील चौघांना तर मानखुर्द येथून आलेल्या एका कोरोना बाधिताच्या कुंटुबियासह संपर्कातील तिघांना असे सतरा जणांना जत शहरातील कोविड सेंटर येथे विलगीकरण कक्षात ठेवले आहे.त्याशिवाय अन्य काहीजण संपर्कात आले आहेत का यांचा शोध प्रशासनाकडून घेतला जात आहे. बाधित तिघांवर मिरज येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान गाव कंटेन्मेट झोन करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना माहिती देण्यात आली आहे. आंवढी,शेगावसह परिसरातील काही गावे आजपासून पुढील काही दिवस लॉकडाऊन राहणार आहेत.गावात औषधांची फवारणी केली आहे. तसेच
ग्रामपंचायत प्रशासन सरपंच व ग्राम सदस्यांना दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.गावच्या सर्व सीमा सील केल्या आहेत.आंवढी व शेगावमधिल हायरिस्कमधील रुग्ण राहत असलेल्या घरांचा परिसर कंन्टेमेंट झोन जाहीर करण्यात येणार आहे.गावाकडे येणारे सर्वच रस्ते बंद करण्यात आले आहेत. कंन्टेंमेट झोनमधील सर्व नागरिकांना आवश्यक त्या जीवनावश्यक वस्तूचे घरपोच केल्या जाणार आहेत.
|