संखमध्ये अनओळखी इसमाचा मृत्यू

संख : जत तालूक्यातील संख येथे एका बेवारस इसमाचा मृत्यू झाला.
संख या गावात सहा महिन्यापासून हा एसम भीक मागत फिरत होता.तो स्पष्टपणे कन्नड बोलत होता. त्या इसमाला गावातील काही लोक त्याचे जेवण देत होते. दि.28 मे रोजी संध्याकाळी अदाजे 4 वाजण्याच्या सुमारास संख ग्रामपंचायत समोर तो मयत अवस्थेत आढळून आला.
गावात अशी चर्चा होती की, त्याला सहज त्याचे नाव विचारले असता त्यांनी नाव यल्लाप्पा व गाव (कर्नाटक) चडचण तालुक्यातील उडचाण असे सांगत होता.गावत भीक मागून खात होता.
उन्हाचा तीव्र तडाका,व भूकेने व्याकूळ झाल्याने त्याचा मृत्यु झाल्याचा पोलीसांचा अंदाज आहे.संखचे पोलिस पाटील सुरेश पाटील पोलीसात वर्दी दिली.घटनास्थळी उमदी सपोनि दत्तात्रय कोळेकर व पी. एस.आय.नामदेव दांडगे यांनी पाहणी केली.