नेर्लीच्या 57 वर्षीय कोरोना बाधिताचा मृत्यु | जिल्ह्यात सायंकाळपर्यंत नऊ रुग्ण कोरोनाबाधित

0

सांगली : सांगली जिल्ह्यात आज सायंकाळी 7:30 वाजेपर्यंत नऊ रुग्ण कोरोणाबाधित झाले आहेत. जिल्ह्यात उपचाराखालील रुग्णांची संख्या 49 झाली आहे .आज अखेर 57 रुग्ण कोरोणामुक्त झाले आहेत. तर चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजतागायत एकूण 110 हा रुग्ण कोरोणाबाधित ठरले आहेत. कोरोना बाधित रुग्णांपैकी तीन रुग्णांची स्थिती चिंताजनक असून आज दोन रुग्ण कोरोणा मुक्त झाले आहेत.आज कोरोणा बाधित झालेल्या रुग्णांमध्ये औंढी तालुका जत येथील मुंबईवरून आलेल्या 3 तीन व्यक्तींचा समावेश आहे. यामध्ये 55 वर्षीय पुरुष 57 वर्षे पुरुष व 29 वर्षे पुरुष अशा तिघांचा समावेश आहे.खानापूर तालुक्यातील कारंजे येथील ३० वर्षिय पुरुष कोरोणा बाधित झाला असून सदर व्यक्ती 18 मे रोजी मुंबईहून आलेली आहे.नेर्ली येथील काल कोरोणा पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीचा 28 वर्षिय मुलगाही कोरोणा बाधित झाला

Rate Card

 आहे.खिरवडे तालुका शिराळा येथील कोरोणा बाधित व्यक्तीच्या निकटवर्तीय 52 वर्षीय महिला कोरोना बाधित झाली आहे.कचरेवाडी तालुका तासगाव येथील 28 वर्षीय पुरुष कोरोना बाधित झाला आहे.आंबेगाव तालुका कडेगाव येथील कोरोना बाधित झालेल्या रुग्णाची बारा वर्षीय मुलगी तसेच नऊ वर्षीय मुलगा ही कोरोना बाधित झाला आहे.नेर्ली तालुका कडेगाव येथील 57 वर्षीय पुरुष नाॅन इनव्हेजिव व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आलेला होता. त्याचा मृत्यू झाला आहे.आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांपैकी औंढी तालुका जत येथील 55 वर्षीय पुरुष सद्यस्थितीत इन्व्हेजीव व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेला आहे.कडेबिसरी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथील 48 वर्षीय पुरुष ऑक्सीजनवर उपचार सुरू आहेत. खिरवडे तालुका शिराळा येथील 56 वर्षीय पुरुषावर ही नॉन इनव्हेजिव व्हेंटिलेटर वर उपचार सुरू आहेत.भारत नगर , मिरज येथील तीस वर्षाची महिला, पिंपरी बुद्रुक तालुका आटपाडी येथील 33 वर्षाचा पुरुष आज कोरोणामुक्त झाले आहेत.अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.