कवटेमहांळच्या लांडगेवाडीतील आठ वर्षाची मुलगी कोरोना बाधित | आज चार नवे रुग्ण

0

सांगली : सांगली जिल्ह्यात कोरोनाचे आज आणखी 4 नवे रुग्ण आढळले आहेत.धक्कादायक म्हणजे कवटेमहाकांळ तालुक्यातील लांडगेवाडीतील आठ वर्षाची मुलगी कोरोना बाधित झाली आहे.जिल्हात आतापर्यत 92 रुग्णापैंकी उपचार घेणारे एकूण 43 रुग्ण झाले आहेत.तर बरे झालेले 47 रुग्ण आहेत.

Rate Card

मुंबईहुन आलेल्या चौघांना कोरोना लागण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.शिराळाच्या करंगुली ता.शिराळा येथील मुंबईहून आलेल्या 33 पुरूष कोरोना बाधित झाला आहे.कडेगावच्या आंबेगाव येथीही मुंबईहून आलेल्या 36 वर्षीय एकजण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला आहे. खानापूरच्या सुलतानगादे येथील मुंबईहून आलेली 57 वर्षाची महिला कोरोना बाधित झाली आहे. आणि कवठेमहांकाळच्या लांडगेवाडी मधील आठ वर्षाच्या मुलीला कोरोना लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.कम्युनिटी क्वॉरंटाईनमध्ये मध्ये होती.आज नवे चार कोरोना बाधित रुग्ण समोर आले आहेत.त्यामुळे सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 43 वर पोहचली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.