सांगलीत कोरोनाचा तिसरा बळी | नवे चारजण कोरोना बाधित

0

सांगली : सांगली जिल्ह्यात आज चार जणांना कोरोणाची लागण झाली असून उपचारा खालील रुग्णांची संख्या आता 41 झाली आहे. शिराळा तालुक्यातील मोहरे येथील कोरोना बाधित रुग्णाचा आज मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आजतागायत एकूण 92 रुग्ण बाधित ठरले आहेत.यापैकी 48 रुग्ण बरे झाले आहेत तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.तर दोन रुग्णांची स्थिती चिंताजनक असून एक रुग्ण कोरोणा मुक्त झाला आहे.कोरोणाबाधित रुग्णांमध्ये ग्रामीण भागातील 54 रूग्ण तर शहरी भागातील 28 रुग्ण बाधित झाले आहेत. मनपा क्षेत्रातील दहा रुग्ण बाधित झाले आहेत.

Rate Card

सुलतानगादे तालुका विटा येथील मुंबईहून आलेली 57 वर्षीय महिला, करुंगुली तालुका शिराळा येथील मुंबईहून आलेला 33 वर्षीय पुरुष, आंबेगाव तालुका कडेगाव येथील मुंबईहून आलेला 36 वर्षे पुरुष, नरसींइगाव (लांडगेवाडी ) तालुका कवठेमंकाळ येथील मुंबईहून आलेली आठ वर्षीय मुलगी हे आज  कोरोना बाधित झाले आहेत. तर कोरोणा बाधित रुग्णांमधील मोहरे तालुका शिराळा येथील पन्नास वर्षे पुरुष (ऑक्सिजनवर नॉन इनव्हेजिव व्हेंटिलेटर)वर उपचार सुरू होते . आज दुपारनंतर प्रकृती बिघडल्याने इनव्हेजिव व्हेंटिलेटर लावण्यात आले होते. तथापि आज त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कडे बिसरी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथील 48 वर्षाचा पुरुष (या रुग्णाने नांगोळे हे मुळगाव नसून मुळगाव असल्याची चुकीची माहिती दिली होती) सदरचा रुग्णला ऑक्सिजन’वर उपचार सुरू आहेत .

खिरवडे तालुका शिराळा येथील 56 वर्षाचा पुरुष सद्यस्थितीत ऑक्सीजनवर उपचार सुरू आहेत.दिनांक 27 मे रोजी आटपाडी येथील 29 वर्षीय पुरुष कोरोना मुक्त झाला आहे .

इतर सर्व रुग्णांची स्थिती स्थिर आहे,अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.