जतेत अफवा पसरविण्याऱ्यांना प्रशासनाचा चाप | जतेत कोरोना रुग्ण नाही ; गुन्हा दाखल करू,पो.नि.रामदास शेळके

0

जत,प्रतिनिधी : जत शहरात सध्या कोरोना पेक्षाही सोशल मिडियात अफवा पसरविणाऱ्या टोळीनेच धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.आता या टोळीच्या मुसक्या आवळण्याचा तसेच अँडमीनसह दोषीवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा प्रांताधिकारी प्रंशात आवटे यांनी दिला आहे.

रवीवारी जत शहरात एका इसमाच्या मृत्यु नंतर झालेल्या सोशल मिडियावरील फेक न्यूज मुळे शहरात भितीचे वातावरण पसरले होते.मुळात कोरोनाचा कोणताही रुग्ण नसताना नको त्या बातम्या पसरवण्यात आल्या होत्या.त्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी आवटे यांनी जत तहसील कार्यालयात तातडीची पत्रकार बैठक घेतली.यावेळी प्रांताधिकारी आवटे, तहसीलदार सचिन पाटील, पोलीस निरीक्षक रामदास शेळके, मुख्याधिकारी हराळे, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.संजय बंडगर,वैद्यकीय अधिक्षक डाॅ.मोहिते आदी उपस्थित होते.

प्रांताधिकारी प्रशांत आवटे म्हणाले,जत शहरात कोरोनाचा एकही रूग्ण नाही तरीही काही लोक सोशल मिडियाच्या माध्यमातून जनतेत भीतीचे वातावरण निर्माण करीत आहेत,यापुढे असे प्रकार घडल्यास ग्रूप अँडमीनसह दोषीवर कारवाई करण्यात येईल.तरूणाचा मृत्यू अन्य आजाराने झाला आहे.तरीही आम्ही सर्व खबरदारी घेतली आहे. 

Rate Card

पोलीस निरीक्षक रामदास शेळके म्हणाले,अफवा पसरविणे हा गुन्हा आहे.त्यामुळे असा प्रकार कोणी केल्यास यापुढे साथरोग प्रतिबंध कायद्यानुसार दोषी व संबंधित ग्रूप अँडमीनवर गुन्हा दाखल करण्यात येईल.

कोरोनाबाबतची कोणतीही माहिती तालुका पातळीवर जाहीर करण्याचे अधिकार तहसीलदार यांना,असल्याचे प्रांताधिकारी यांनी सांगितले.त्यामुळे जत तालुक्यातील अफवा पसरविणाऱ्या प्रशासनाने चाफ लावला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.