तुंग येथील बालिकेच्या खुनाचा उलगडा

0

सांगली : तुंग ता.मिरज येथील बालिकेच्या खूनाचा उलघडा झाला आहे.

एका अल्पवयीन मुलाने त्याचेकडील मोबाईलवर पोर्न फिल्म त्या बालिकेस दाखवून तिचेवर लैंगिक अत्यावर करत,तिचा दगडाने डोक्यात दुखापत करुन तिच्याच लेगीजने गळा आवळून खून केल्याने गुन्ह्याची कबूली पोलीसांना दिली आहे.
पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी,तुंग येथील चांदोली वसाहत मधील वासु पाटील यांचे ऊसाचे शेतामध्ये एका 8 वर्षीय लहान मुलीचा खुनाची घटना दि.21 रोजी सकाळी 8.00 वाजण्याच्या 

सुमारास उघडीस आली होती.घटनेचे गार्भिर्य ओळखून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत तपासाच्या सुचना दिल्या होत्या.पोलीस अधीक्षक सुुहैल शर्मा,अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा डुबुले, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक विरकर,स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रमुख श्रीकांत पिंगळे 

Rate Card

घटनास्थळाची पाहणी करून तपासाच्या सुचना दिल्या होत्या.

या गुन्ह्याचा तपास करीत असताना, गुन्ह्यातील लहान मुलगी ही घरातून दुकानाकडे खाऊ आणणेसाठी गेली असता दुकानाच्या पाठीमागील बाजूस ऊस पिकाच्या चेंबर जवळ अल्पवयीन मुलगा त्या मुली सोबत खेळत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांना मिळाली.सदरचा मुलगा अल्पवयीन असल्याने बालन्याय अधिनियम मधील तरतुदीचे पालन करून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने त्याला विश्वासात घेवून विचारपूस केली असता,यातील अल्पवयीन मुलगा हा त्याचेकडील मोबाईलवर पोर्न फिल्म त्या मुलीस दाखवून तिचेवर लैंगिक अत्यावर करून,दगडाने डोक्यात दुखापत करुन तिचा तिचे लेगीजने गळा आवळून खुन केल्याने गुन्हयाची कबूली दिल्याने त्यास पुढील तपास कामी उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक विरकर याचेकडे सुपूर्द करणेत आला. त्यांनी सदर बालअपचारी यांच्या कडुन गुन्ह्यात वापरलेला मोबाईल व गुन्ह्याचे वेळी अंगावर असणारे कपडे जप्त करणेत आले आहे.सदर गुन्हयाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अशोक विरकर हे करीत आहेत.

गुन्हा उघडकीस आणणेकामी पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांचे मार्गदर्शनाखाली पो.उपनि. प्रविण शिंदे, प्रदीप चौधरी, शरद माळी,अंतम खाडे,सागर पाटील, जगन्नाथ पवार,बिरोबा नरळे, राजू मुळे,अमित परीट,निलेश कदम,अरूण औताडे, जितेंद्र जाधव,मेघराज रूपनर,मारूती साळुखे, पोलीस नाईक सागर लवटे,संदिप गुरव, संदिप नलवडे,वैभव पाटील,राहुल जाधव, संदिप पाटील,अनिल कोळेकर, गौतम कांबळे, संतोष गळवे,आर्यन देशिंगकर, शंकर पाटील, शाम काबुगडे, सचिन सुर्यवंशी, अरूण सोकटे, बजरंग शिरतोडे, निसार मुलाणी यांनी सहभाग घेतला .

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.