म्हैसाळचे पाणी तालुक्यात फिरविण्याचे काम ना.जयंत पाटीलच करणार ; अँड.चन्नाप्पा होर्तीकर

0

उमदी,वार्ताहर : जत तालुक्याचे नंदनवन करण्याचे सामर्थ्य फक्त जलसंपदा मंत्री व सांगली जिल्हाचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडेच आहे. स्वर्गीय राजारामबापू पाटील यांचे दुष्काळी तालुक्यात म्हैसाळ योजनेतून पाणी फिरविण्याचे स्वप्न होते ते त्यांचे सुपुत्र मजयंत पाटील यांनी पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. दुष्काळी जत तालुक्यात पूराचे पाणी फिरवण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह असून, सध्या वाहून जाणार्‍या  म्हैसाळ योजनेच्या पाण्यावर नारळ फोडणाऱ्यांची संख्या जत तालुक्यात वाढत आहे. जतच्या पूर्व भागातील म्हैसाळ योजनेत समाविष्ट असणाऱ्या तसेच वंचित गावांना पाणी देण्याचे सामर्थ्य जयंत पाटील यांच्याकडेच असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य ॲड.चन्नाप्पा होर्तिकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. यावेळी माजी सभापती रेवाप्पाण्णा लोणी, तालुका उपाध्यक्ष फिरोज मुल्ला, रवी शिवपुरे, शिवलिगपा बगली आदी उपस्थित होते.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी नुकतीच घोषणा केल्याप्रमाणे पुराचे पाणी यंदा दुष्काळी जत तालुक्‍यात फिरवण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. या निर्णयामुळे अनेक वर्षापासून दुष्काळी असलेल्या जत तालुक्यातील मोठे क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत. 

गत वर्षात पुराच्या पाण्यामुळे जिल्ह्यातील सांगली मिरज जवळच्या कृष्णा नदीच्या काटालगतच्या गावांना पुराचा मोठ्या प्रमाणात फटका बसला होता.त्यामुळे त्यातील सुमारे सहा टीएमसी पाणी दुष्काळी भागात सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

गेल्या दोन तपासून जत तालुक्यातील योजनेत समाविष्ट अनेक गावे म्हैसाळ योजनेच्या पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. तालुक्यातील दोन मध्यम प्रकल्प, 28 साठवण तलाव 240 सिमेंट बंधारे, छोटे मोठे पाजर तलाव आहेत.पावसाळ्यात पूराच्या वाहून जाणार्‍या पाण्याने भरून दिल्यास जतचा दुष्काळ हटवण्यासाठी मदत होईल. दरवर्षी 89 गावे 752 वाड्यावस्त्या वर टँकरने पाणीपुरवठा केला जातो. जातत्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च होतोय तो खर्च कायमचा थांबणार आहे. सध्या योजनेचे काम पूर्णत्वाकडे आहे कॅनॉल पंप पाऊस बंदिस्त पाईपलाईन या माध्यमातून तालुक्यातील अनेक गावातील तलाव बंधारे नालाबांध ओडे नाल्यांमध्ये पाणी साठवणे शक्य आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी घोषणा केल्याप्रमाणे पुराचे पाणी दुष्काळी भागात सोडून सर्व ओढे नाले तलाव बंधारे भरण्यात येणार आहेत. तसा आराखडाही जलसंपदा विभागाकडून तयार करण्यात आला आहे. या पाण्यामुळे अनेक दिवसापासून पाणी येण्याची वाट बघत बसलेला शेतकरी सुखावला जाणार आहे. त्याशिवाय जत तालुक्यात हरितक्रांती आणण्याचे लोकनेते राजारामबापू पाटील यांचे स्वप्न त्यांचेच सुपुत्र जयंत पाटील यांच्या माध्यमातून पूर्णत्वाकडे जाणार आहे. असेही ॲड.चन्नाप्पा होर्तिकर म्हणाले.

Rate Card

              

 पुराचे वाहून जाणारे पाणी दुष्काळी जत तालुक्यात फिरवण्याचा जो निर्णय जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी घेतला तो निर्णय स्वागतार्ह आहे. म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून या योजनेत समाविष्ट असणाऱ्या गावातील तलाव ओढे नाले भरण्याचे नियोजन आहे. त्‍याप्रमाणे वंचित म्हैसाळ योजनेतील समाविष्ट नसणाऱ्या गावांनाही पाणी  देण्यासंदर्भात विचार व्हावा तरच पाणी टंचाईची समस्या दूर होईल.
:-  श्रीमती रेश्माकका होर्तिकर, माजी जि.प.अध्यक्षा. 

             

  

म्हैसाळ योजनेच्या कालव्यातून वाहून जाणाऱ्या पाण्यावर नारळ फोडणाऱ्यांची संख्या जत तालुक्यात वाढत असून आयत्या पाण्यावर लुडबुडू करू नये, पालकमंत्री जयंत पाटील यांच्यामुळेच जत तालुक्यात पाणी पोहचले आहे. ज्या गावांना पाणी मिळालेले नाही त्या गावांना पाणी देण्यासाठी तालुक्यातील मंडळीनी प्रयत्न केल्यास हिताचे ठरेल.
:-  ॲड.चन्नाप्पा होर्तिकर मा. जि. प. सदस्य उमदी.
   

                 

जत तालुक्याच्या पूर्व भागातील जवळजवळ 55 गावांचा पाण्याचा प्रश्न गंभीर असून म्हैसाळ योजनेच्या सहाव्या टप्प्यात समाविष्ट असणाऱ्या गावांना पुराचे वाहून जाणारे पाणी देण्याच्या निर्णयाचे स्वागत आहे. मात्र म्हैसाळ योजनेच्या सहाव्या टप्प्यात समाविष्ट नसणाऱ्या माडग्याळ उमदी परिसरातील 42 गावांनाही नैसर्गिक उताराने पाणी सोडल्यास तालुक्यातील पाणीप्रश्न सुटेल.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.