शेतकऱ्यांचे विज बिल माफ करावे : विकास साबळे

0

जत,प्रतिनिधी : जगभर कोरोना महामारीचे संकट ओडविले आहे.त्यामुळे मार्चपासून देशभर लॉकडाऊन असल्याने सर्व बाजारपेठा बंद आहेत.त्याचा सर्वाधिक फटका शेकऱ्यांना बसला आहे.शेतकऱ्यांनी उत्पन्नाच्या आशेवर भाजीपाला,फळबागा व इतर पिकांची पेरणी केली होती.उत्पन्नही बऱ्यापैंकी आले होते.मात्र लॉकडाऊनमुळे बाजार समित्या,आठवडे बाजार,बंद असल्यामुळे माल पडून राहिला परिणामी अनेक शेतकऱ्यांनी पिके विक्री न झाल्याने जनावरांना घातला,काही जणांनी थेट नांगर फिरवला.लागवडीच्या पट्टीत उत्पन्न आले नाही.त्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत आला आहे. त्यातच जनावरांच्या वैरण,पेंडीचे दर भकडले असताना, दुधाचे भाव पडले आहेत.अशा परिस्थितीत जगाचा पोशिंदा बळीराजा हवालदिल झाला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या किमान विहिरीवरील मोटारीची सहा महिन्याचे वीज बील माफ करून दिलासा द्यावा अशी मागणी रिपाइचे जिल्हा उपाध्यक्ष विकास साबळे यांनी केली आहे.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.