कै.अरूणआण्णा शिंदे स्पोर्टस् क्लबकडून नगरपरिषद कर्मचाऱ्यांना फेस शिल्डचे वाटप
जत,प्रतिनिधी ; जत येथील कै.अरूणआण्णा शिंदे स्पोर्टस् क्लब जत चे वतिने जत नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना फेस शिल्डचे वाटप करणेत आले. त्यावेळी स्पोर्टस् क्लब जतचे अध्यक्ष सनी महाजन,विनय अय्यंगार व सुजय शिंदे उपस्थित होते.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कोरोना योध्दा म्हणून हे कर्मचारी शहरात काम करत आहेत.ते सातत्याने नागरिकांच्या संपर्कात येत असतात.त्यामुळे कोरोनापासून त्यांचे संरक्षण व्हावे यासाठी कै.अरूणआण्णा शिंदे स्पोर्टस् क्लब जतच्या वतीने हे प्रांरभी 50 फेस शील्ड कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत.यापुढेही मागणीनुसार असे किट देण्यात येणार असल्याचे माजी नगरसेवक नाना शिंदे यांनी सांगितले.

कै.अरूणआण्णा शिंदे स्पोर्टस् क्लब जत चे वतिने जत नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना फेस शिल्डचे वाटप करण्यात आले.