देवत्व मिळविलेला,जनसामान्याचा दाता ; हभप तुकाराम बाबा
संत गाडगे महाराज यांचे शिष्य संत बागडे महाराज व संत बागडे महाराज यांचे शिष्य संत तुकाराम महाराज,नुसते संतच नव्हे तर त्याला दैवत्व प्राप्त केलेले काही संतापैंकी एक संत म्हणजे तुकाराम बाबा,जत,मंगळवेढा तालुक्यातील सामान्य जनतेच्या मदतीला धावून जाणारे देवताच..
अशा दैवत्व प्राप्त झालेल्या व्यक्तीमहत्वाचा आज वाढदिवस त्यानिमित्त थोडक्यात..
सन 1989 म्हणजे जवळजवळ 30 ते 32 वर्षे झाले त्यांचे आमचे सबंध घरोब्याचे आहेत.आमच्या कुंटुबातील ते आहेत,असे जिव्हाळ्याचे नातेसंबध आहेत.
त्यांनी सांगली शहरामध्ये सन 2003 मध्ये 3 लाख दिवे एकाचवेळी लावण्याचा “लक्षदीय” तरूण भारत व्यायाम मंडळाच्या क्रिडांगणावर आयोजित केलाला होता.महाराष्ट्रातील मोठ-मोठे संत हजारो भक्त यावेळी उपस्थित होते.सांगलीतील हा भव्यदिव्य कार्यक्रम कायम स्मरणात राहणारा आहे.
जत सारख्या दुष्काळी भागामधील तालूक्यामधील प्रत्येक गावामध्ये पिण्याचे पाणी स्व:ताच्या टँकरने पुरविणे.तीव्र दुष्काळातील जनावरे जगली पाहिजेत,पशुधन वाचविण्यासाठी स्व:ताच्या खर्चातून चारा छावणी सुरू करत केलेली मदत उल्लेखनीय आहे.गोरगरीबासाठी अन्नदान करणे,गोरगरिबासाठी
शासनाच्या सहकार्याने घरकुल योजना राबविणे,अशी अनेक सामाजिक व धार्मिक कार्याद्वारे त्यांनी समाज कार्य अखंड सुरू ठेवले आहे.जत तालुक्यात स्वांतत्रापासून असलेला पाणी प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न त्यांनी चालविला आहे.त्यासाठी शासनास जतकरांच्या भावना कळविण्यासाठी जत ते मुंबई पायीदिंंडी काढत सरकारचे लक्ष वेधले होते.पाणी द्या,अन्यथा मी लोकवर्गणीतून कँनॉल काढण्यासाठी परवानगी द्या,असे शासनास ठणकावून सांगणारे तुकाराम बाबा हे राज्यातील एकमेव आध्यात्मिक गुरू होत.
आमच्या सांगलीवाडी येथील शेतामध्ये त्यांनी गुरू स्वामी समर्थ महाराज मठाची स्थापना केलेली आहे.तसेच भुयार येथील मठामध्ये दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकास दररोज नाष्ठा,जेवन व राहण्याची सोय मोफत केली आहे. अनेक वर्षापासून हा उपक्रम अखंड सुरू आहे.
गोधळेवाडी येथील स्वता;च्या शेतामध्ये त्यांनी मठ बांधलेला आहे.गोरगरिबांच्या लग्नासाठी सोय व्हावी म्हणून एक भव्य असे मंगल कार्यालय बांधलेले आहे.याठिकाणीही भाविकांच्या राहण्यासह जेवनाचीही सोय केली आहे.सांगली व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महापूराचेवेळी अनेक गावामध्ये त्यांनी स्व:ता जावून जिवनावश्यक वस्तूचे वाटप करून अनेक लोंकाना आधार दिला होता.सध्या जगभर सुरू असलेल्या कोरोना विषाणूच्या महामारीतही बाबा जत तालुक्यातील नागरिकांच्या मदतीसाठी धावून आले आहेत.पोलीसांना चहा,नाष्ट्याची सोय, जीवनावश्यक वस्तू,तब्बल एक महिना भाजीपाला वाटप करून त्यांनी सामाजिक बांधिलकी कायम जपली आहे.गेल्या आठवड्यात परराज्यातून चालत चालेल्या मजूरांना धीर देत आठ दिवस राहण्यासह जेवणाची सोय करत शासकीय परवानगी काढून स्व:ताच्या बसने पाठवून दिले आहे.
गोरगरीब जनतेची अतिशय तळमळ असलेले सतत मानवतेच्या दृष्टीकोनातून तळागाळातील लोंकाना गेली अनेक वर्षे मदत करत असलेले हे संत तुकाराम महाराज हे देवी अवतारच आहेत.

बाबांनी जोडलेल्या दानसूर माणसाच्या मदतीवर तुकाराम बाबांनी सामाजिक परिवर्तनाची साद घातली आहे.
सामाजिक कार्यातून जत तालुक्यासह जिल्ह्यातील धार्मिक परिवर्तनात तुकाराम बाबा महाराज एक दिव्य शक्ती म्हणून यापुढेही कार्यरत राहतील.त्यांच्या पुढील कार्यास ईश्वरी शक्ती लाभो हि प्रार्थना…
शंब्दाकन ;
रामभाऊ घोडके
माजी नगराध्यक्ष,सांगली नगरपरिषद
माजी सदस्य,सा.मि.कु.रा.महानगरपालिका
अध्यक्ष, आझाद व्यायाम मंडळ
अध्यक्ष,सांगली जिल्हा कब्बडी असोसिएशन