अभिमन्यू मासाळ यांचा चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेकडून सत्कार
सांगली : दि सांगली सॅलरी अर्नर्स को-ऑप सोसायटी सांगली चेअरमनपदी अत्यंत अनुभवी व्यक्तिमत्त्व असलेले, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना सातत्याने मदतीचा हात पुढे करणारे अभिमन्यु मासाळ यांचा राज्य सरकारी गट-ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघ महाराष्ट्र जिल्हा शाखा सांगलीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी सांगली जिल्हा महासंघाचे जिल्हाध्यक्ष संजय व्हनमाणे, सरचिटणीस गणेश धुमाळ,कार्याध्यक्ष मिलिंद हारगे, कोषाध्यक्ष संदीप सकट, जिल्हा उपाध्यक्ष संजय सडकर,मध्यवर्ती संघटनेचे कोषाध्यक्ष सदाशिव सूर्यवंशी तसेच सॅलरीचे विद्यमान संचालक शरद पाटील, राजेंद्र कांबळे,अरुण बावधनकार व कर्मचारी विशाल मेहतर,संजय विभूते उपस्थित होते.