कोरोना | सोलापूरच्या पार्श्वभूमीवर जाडरबोबलादमध्ये दक्षता | सोलापूरला जाणारे रस्ते बंद
जाडरबोबलाद,वार्ताहर : जाडरबोबलाद ता.जत येथे दुसऱ्यावेळी जनता कर्फ्यू लागू लावण्यात आला आहे. गावात सकाळी 7.30 ते 10.30 पर्यत किराणा,दुध व अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरू ठेवण्यात येतात.इतरवेळी कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.ग्रामपंचायतीकडून सर्व प्रकारे सतर्कता बाळगण्यात येत आहे. लगतच्या सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने सर्व प्रकारे दक्षता बाळगण्यात येत आहे. गावाच्या सर्व सिमा बंद करण्यात आल्या आहेत. नव्या माणसांना गावात येण्यास मनाई करण्यात येत आहे. प्रतिबंधित औषध फवारणी, स्वच्छता,मास्क,सँनिटायझर वाटप करून जनजागृत्ती करण्यात येत आहे. पदाधिकारी, पोलीस स्वंयसेवकांकडून खबरदारी घेतली जात आहे.

जाडरबोबलाद ता.जत येथे कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.