माडग्याळमध्ये विवाहतेची आत्महत्या

माडग्याळ,वार्ताहार : माडग्याळ ता.जत येथील विवाहिता सविता मल्लीकार्जून बजंत्री (वय 20) हिने शेतातील राहत्या घरी लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केल़्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत उमदी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,सविता बजंत्री ह्या पती,सासू-सासरे,पाच महिन्याच्या लहान मुलीसह शेतातील घरात राहतात.सासू-सासरे दीर ऊसतोडीच्या कामासाठी बाहेर गावी आहेत.सध्या सविता,पती मल्लिकार्जुन माडग्याळ येथे राहतात.सोमवार (ता.9)रोजी पती मल्लिकार्जुन मजूरीसाठी बाहेर गेले होते.घरात सविता एकट्याच होत्या, दुपारी तीनच्या दरम्यान सविताने घरातील अँगलला गळपास लावून आत्महत्या केली.आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.सा.पो.निरिक्षक बसवराज कोष्टी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे.