शेगावच्या संरपचपदी धोडिराम माने | बिनविरोध निवड : कतृत्वान नेतृत्वाला संधी
शेगाव,वार्ताहर : शेगाव ता.जत येथील ग्रामपंचायतीच्या संरपचपदी राधाकृष्ण उद्योग समुहाचे संस्थापक धोंडिराम उर्फ गुंडा माने यांची बिनविरोध निवड झाली.ग्रामपंचायतीवर कॉग्रेसची सत्ता आहे.सर्वोनुमत्ते ठरल्यानुसार रविंद्र पाटील यांनी पहिल्या टर्ममध्ये अडीच वर्षे संरपच म्हणून काम पाहिले होते.त्यानंतर कॉग्रेस नेते महादेव सांळुखे यांच्या पत्नी सौ.वर्षा सांळुखे यांनी दुसऱ्या टर्ममध्ये

संरपच म्हणून काम पाहिले.तिसऱ्या टर्ममध्ये आण्णासो नाईक यांना संरपच पदाची संधी मिळाली होती.नुकताच त्यांनी राजीनामा दिल्यानंतर नव्याने धोंडिराम उर्फ गुंडा माने यांची बिनविरोध निवड झाली.
शेगाव परिसरात राधाकृष्ण उद्योग समुहाच्या दुध डेअरी,पशूखाद्य,ग्राहक बजार आदी व्यवसायातून स्थानिक तरूणांना रोजगार,शेतकऱ्यांना डेअरीच्या माध्यमातून मोठी मदत करत एक वेगळा ठसा गुंडा माने यांनी उमटविला आहे.अशा सातत्याने लोकहितासाठी काम करणाऱ्या नेतृत्वाला पँनेल प्रमुखांनी संरपच होण्याची संधी दिली आहे.यावेळी मानळते संरपच आण्णाप्पा राचाप्पा नाईक,उपसरपंच सौ.वर्षा महादेव साळुखें,ग्रामपंचायत सदस्य रविंद्र रामराव पाटील,सदस्या सौ.निता कृष्णदेव बुरुटे,सौ.सुजाता प्रकाश वाघमोडे,सौ. रुपाली धनाजी ताटे,सौ.ताई नामदेव हिरवे,सौ.रंजना सखाराम बुरूटे,सौ. विजया समाधान शिंदे,अमिर गुलाब मुजावर,बबन बापूसो सावंत, दत्तात्रय व्हनमाने,दत्तात्रय निकम (सर) उपस्थित होते.मंडळ अधिकारी भारत काळे व ग्रामविकास अधिकारी श्रीमती के.जी.गवळी यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.
कालावधी कमी मिळाला आहे,मात्र पँनेलचे नेते,माझे सहकार्य सदस्य यांना बरोबर घेत मिळालेल्या संधीचे सोने करत स्थानिक प्रश्न सोडवून गावाचा नावलौलिक निर्माण करू – धोंडिराम उर्फ गुंडा मानेनुतन संरपच,शेगाव
शेगावच्या संरपचपदी निवड झाल्याबद्दल धोंडिराम उर्फ गुंडा माने मावळते संरपच आण्णासो नाईक आदी मान्यवर