आगीत होरपळून शेतकऱ्याचा मुत्यू | दरिबडचीतील दुर्घटना : पत्नी बचावली

0

Rate Card

संख,वार्ताहर : दरीबडची (ता जत) अचानक छप्परास आग लागून वयोवृद्ध हणमंत गुरबाळा माळी (वय 65 वर्षे) यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला.या आगीमध्ये मयतची पत्नी सखुबाई हणमंत माळी या किरकोळ भाजल्या आहेत.आगीमध्ये 1 लाख 10 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.घटना दुपारी 2 वाजता घडली.ह्या घटनेची नोंद जत पोलिसात झाली आहे. 

जत पूर्व भागातील दरीबडची येथून 2 कि.मी अंतरावर मासाळवस्ती जिल्हा परिषद शाळेजवळ माळी वस्तीवर मयत हणमंत माळी व पत्नी सखुबाई हे मळ्यातील छप्परात रहातात.दोघांनाही लकवा झालेला आहे.मुलगा भगवंत आपल्या कुटुंबासमवेत गावात रहातो.तो जत येथील पटाईत किराणा दुकानात काम करीत होता.वडीलाला लकवा मारल्यानंतर काम सोडले आहे.दुसरा मुलगा गुरुबाळा ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करत जतला राहतो.मयत हणमंत माळी यांना दीड महिन्यापूर्वी लकवा झालेला होता.नागरमोळी येथे उपचार केलेला आहे.पत्नी सखुबाई हिला तीन महिन्यापूर्वी लकवाचा आजार झाला आहे.दुपारी मुलगा भगवंत यांनी सकाळी जेवण व दुपारी चहा करुन देऊन गावात आलेला होता.तो गावात आल्यानंतर अचानक छप्पराला आग लागली.शेजारचे शेतात कामाला गेल्यामुळे तातडीने आग विजवता आली नाही.पत्नी सखुबाई हणमंत माळी ही छप्परालगत बाहेर बसलेली होती,पण सखुबाई यांनाही लकवामुळे चालता बोलता येत नाही.आगीचे चटके बसल्यानंतर बोलता येत नसतानाही जीवघेण्या झळामुळे त्या जोराने ओरडल्याने त्याच्या शेजारी शेतात ज्वारीला पाणी पाजणारे शेतकरी देवाप्पा मासाळ यांनी जीवाची पर्वा न करता बाहेर बसलेल्या सखुबाई माळी यांना उचलून नेऊन बाजूला ठेवले. या घटनेत सखुबाई यांचा हात किरकोळ भाजला आहे.आगीत एक लाख दहा हजार रुपयाचे नुकसान झाले आहे.यामध्ये रोख 25 हजार रुपये, एक तोळा सोने,संसारपयोगी साहित्य, धान्य जळून खाक झाले.छप्पर पालोपाचोळाचे असल्याने आगीने रैद्ररुप धारण केले. शेजारील लोक आग विझविण्यासाठी आले.परंतु आगीचा भडका उडाल्याने आग विजवता आली नाही.तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद कांबळे करीत आहेत.

आवाज पिळवटून टाकणारा :

छप्पराला आग लागल्यानंतर चटके बसायला लागल्यानंतर वयोवृद्ध मयत हणमंत माळी यांचा आरडाओरडा हृदयपिळवटून टाकणारा होता.आगीने चोहबाजूने घेरलेले होते.त्यावेळी छप्पराचे छत आगीने खाली कोसळले.दुर्देव्याने कोणालाही मदत करता आली नाही.

तीन दिवसातील दुसरी घटना 

दरीबडची येथील मासाळवस्तीवरील बिराप्पा तुकाराम मासाळ यांच्या झोपडीला आग लागून 5 लाख 60 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.मंगळवार ही घटना घडली आहे.

दरीबडची (ता जत) येथे आग लागून झोपडी जळून खाक झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.