बेदाणा उत्पादकांना कोट्यावधीचा फटका | थंडीने बेदाणा काळा पडला : उत्पादन थांबले
जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील द्राक्षबागायतदारांवर निसर्गाच्या आपत्तीचे संकटसत्र सुरूच राहिले आहे.दुष्काळ,अतिवृष्ठी आणि आता अति थंडी, व ढगाळ हवामानामुळे निकृष्ट दर्जाचा बेदाणा तयार होत आहे. या अनोख्या अस्मानी संकटामुळे बागायतदार हतबल झाले आहेत.नेमक्या सिजनमध्ये हवामान बिघडल्याने सुमारे पाच कोटीचा फटका तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला आहे.बारा दिवसात तयार होणारा बेदाणा वीस-बावीस दिवसानंतर तयार होत आहे. तोही काळाकुट्ट शंभर किलोप्रमाणे चार किलो द्राक्षापासून तयार होणारा बेदाणा आता पन्नास रूपये किलोदराने विकणारा तयार होता आहे.त्यामुळे प्रचंड नुकसान होणारी बेदाणा निर्मिती आता थांबल्याचे चित्र आहे. यंदाच्या हंगामात सततच्या पावसाने निकृष्ट प्रतिची द्राक्षे उत्पादित होऊ लागली आहेत. त्यामुळे द्राक्षांचे दर ढासळले आहेत. तर बहुसंख्य शेतकर्यांनी द्राक्षांपासून बेदाणा निर्मितीचा पर्याय निवडला आहे. सध्या बेदाणा निर्मितीचा हंगाम जोरात सुरू आहे. मात्र, ढगाळ हवामान व वाढत्या धुक्यामुळे शेडवरील बेदाणा ओलसर होत आहे. यातून बेदाण्याचा अक्षरश: चिखल बनत आहे.त्यामुळे तयार होणारा बेदाणा काळा पडून निकृष्ट प्रतिचा होणार आहे, परिणामी त्याला बाजारात दर मिळणार नाही. त्यामुळे बागायतदारांच्या चिंतेत भर पडली आहे.खराब वातावणामुळे जत तालुक्यात सुरू असलेल्या बेदाणा शेडवर असा निकृष्ट बेदाणा सर्रास दिसू लागला आहे. मोठ्या कष्टातून वाचवलेल्या द्राक्षांची ही अवस्था झाल्याने शेतकरी हैराण बनले आहेत. वाचलेल्या द्राक्षातून किमान औषध व मजुरीचा खर्च तरी निघेल या आशेवर द्राक्षबागायतदार आहेत.तर दुसरीकडे द्राक्ष बागेतील द्राक्षे मुदतीच्या पुढे जात असल्याची मणी गळ्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.अति थंडीचा मोठा फटका द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना बसला आहे.मार्केट व बेदाणा दर उतरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

राज्यात दरवर्षी सुमारे 5 ते 10 टन बेदाण्याचे उत्पादन तालुक्यात होते. मात्र, अवकाळी पावस,अती थंडी,ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान आणि तीन वर्षांपासून बेदाण्याला अपेक्षित दर नसल्याने शेतकऱ्यांनी द्राक्ष निर्यातीस प्राधान्य दिल्याने यंदा बेदाण्याचे 30 टक्केच उत्पादन होण्याचा अंदाज आहे.
जत तालुक्यातील बेदाणा निर्मिती सेडवरील बेदाण्याची आवस्था