Untitled Post

0
Rate Card

जत,प्रतिनिधी : जत पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता अभिमन्यू मासाळ यांना तासगावच्या प्रतिष्ठा फौंडेशनचा प्रतिष्ठा प्रशासनरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. तासगाव येथे झालेल्या प्रतिष्ठा राज्यस्तरीय साहित्य संमेलनात समेलनाध्यक्ष उत्तम कांबळे,कार्याध्यक्ष अभयकुमार सांळुखे,लालासाहेब मोरे, सुदेश दळवी,प्रतिष्ठानचे अध्यक्ष तानाजी जाधव आदी मान्यवरांच्या हस्ते श्री.मासाळ यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. जत पाटबंधारे विभागाच्या म्हैसाळ प्रवेश कालवा उपविभागाचे श्री.मासाळ शाखा अभियंता म्हणून कार्यरत आहेत.आदर्श अधिकाऱ्याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. ग्रामीण भागाच्या विकासाचे स्वप्न घेऊन त्यांनी जत पाटबंधारे विभागात म्हैसाळ प्रवेश कालवा उपविभागात शाखा अभियंता म्हणून त्यांचे काम सुरू आहे.जलसिंचन नसानसात भिनलेल्या श्री.मासाळ यांनी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहचविण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले आहे.अंकले ते बिंळूर हा सुमारे पन्नास किलोमीटरच्या देवनाळ कालव्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे.गत उन्हाळ्यात पुर्ण काम नसतानाही बिंळूरपर्यत पाणी नेहयाचे शिवधनुष्य उचलत त्यांनी बिंळूरच्या तलावात पाणी सोडण्यासाठी केलेले कौशल्य व परिश्रम वागण्याजोगे आहे.जत

तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचले पाहिजे आणि सारे शिवार हिरवे झाले पाहिजे ही जिद्द बाळगून ते प्रशासनाच्या वतीने ते काम करत आहेत. 

त्यांनी दिलेल्या योगदानामुळे जत पश्चिम भागातील शेतीला जीवदान मिळाले. म्हणूनच शेतकऱ्याचे भगिरथ म्हणून त्यांचे नाव अग्रस्थानी आहे.अशा ‘जलदूत’ व जनतेचे खरे हिरो असलेल्या अधिकाऱ्यांची कामाची गुणात्मकतेची दखल घेवून ‘प्रतिष्ठा प्रशासन रत्न पुरस्कार 2020’ देऊन गौरव करण्यात आला आहे. जत तालुक्यात त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

जत पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता अभिमन्यू मासाळ यांना पुरस्कार प्रदान करताना मान्यवर

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.