शेतकऱ्यांचा साताबारा कोरा करण्याची मागणी | संख स्वा.शे.संघटनेचे निवेदन

संख,वार्ताहर : जत तालुक्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा व सीआरईपी करार रद्द करा या मागणीचे निवेदन स्वा.शेतकरी संघटनेच्या वतीने संख तहसीलदार यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की,आघाडी सरकारमधील पक्षांनी निवडणूकीपुर्वी सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते.मात्र आता दोन लाख लाख कर्ज माफ करत तोंडा पाने पुसली जात आहेत. शेतकऱ्यांचा सातबारा करावा.बेरोजगार तरूणांना काम उपलब्ध करून द्यावे,शेतकऱ्यांच्या दुध,फळे,व शेतमालापासून तयार होणारे उप पदार्थ भारतातच विकावेत.आंतरराष्ट्रीय करार रद्द करावेत,अशा मागण्या निवेदनात केल्या आहेत.यावेळी भिमाशंकर बिराजदार,नागनाथ शिळीन,सिंदगोंडा बिरादार,ओग्याप्पा कोळी,राजकुमार बिरादार,विठ्ठल कुंभार,भाऊराया बिरादार,भिमराव बिरादार,विश्वनाथ बिरादार आदी मान्यवर उपस्थित होते.
संख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा या मागणीचे निवेदन देताना स्वा.शे.संघटनेचे पदाधिकारी