महाराजा दत्ताजीराव शिंदे स्मृतिदिनी उलगडला शिंदेशाहीचा इतिहास | राज्यस्तरीय शिंदेशाही स्नेहमेळावा वाळेखिंडीत संपन्न

जत,प्रतिनिधी : श्रीमंत महाराजा महादजी शिंदे सरकार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने रणझुंजार महाराजा दत्ताजीराव शिंदे यांचा स्मृतिदिन व शिंदे शाही घराण्याचा राज्यस्तरीय स्नेहमेळावा, वाळेखिंडी, ता.जत येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या मेळाव्यास राज्यभरातील हजारो शिंदे बांधवांनी हजेरी लावली.
दिल्लीच्या तख्तावर 15 वर्षे भगवा फडकविणारे महाराजा महादजी शिंदे व महाराजा दत्ताजीराव शिंदे यांचा गौरव व्हावा यासाठी शिंदे सरकार घराण्यातील बांधवांचा स्नेहमेळावा वाळेखिंडी येथील सिध्दनाथ हायस्कूलच्या प्रांगणात संपन्न झाला.
मेळाव्यास माजी मंत्री शशिकांत शिंदे, सुप्रसिद्ध वक्ते व कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष प्रा.नितीन बानुगडे-पाटील,आमदार विक्रमसिंह सावंत, माजी आमदार विलासराव जगताप, बाजार समितीचे माजी सभापती सुरेशराव शिंदे सरकार,महाराजा महादजी शिंदे सरकार प्रतिष्ठानचे सुहास शिंदे,अतिरिक्त जिल्हाधिकारी राजाराम शिंदे,अँड.प्रभाकर जाधव, जि. प. सदस्य महादेव पाटील, बाबासाहेब कोडग, नाना शिंदे,माजी उपसभापती शिवाजी शिंदे, जेष्ठ नेते एन.डी.शिंदे उपस्थित होते.
प्रा.नितीन बानुगडे-पाटील म्हणाले,महाराजा महादजी शिंदे यांनी दिल्लीच्या तख्तावर एक दोन दिवस नव्हे तर तब्बल 15 वर्षे भगवा फडकविला. म्हणून आजही दिल्लीवाले मराठ्यांना वचकुन आहेत.मराठ्यांनी केवळ दिल्लीवरच राज्य केले नाही तर पाकिस्तान,अफगाणिस्तान,बांगलादे
माजी मंत्री शशिकांत शिंदे म्हणाले, पानीपत हा चित्रपट मी पाहिला मात्र या चित्रपटात महाराजा दत्ताजीराव शिंदे यांना काही सेकंदच दाखविले आहे.तर महादजी शिंदे यांचा फक्त उल्लेख केला आहे.दिल्ली काबिज करणाऱ्या या राजांचा इतिहास पुन्हा जनतेसमोर मांडला जाईल.त्याची सुरुवात वाळेखिंडीतून करण्यात येईल.यावेळी अप्पर जिल्हाधिकारी आर.टी.शिंदे,उपसचिव सुबराव शिंदे,कमिश्नर अजय शिंदे,स.फा.प्रो.क.लि.चे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे,माल व प्रवासी राज्य संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे,निवृत्त कँप्टन प्रसाद शिंदे, जळगाव नगरपरिदेच्या मुख्याधिकारी उज्वला शिंदे,तेजस शिंदे,प्रतापराव शिंदे,आरूषी शिंदे यांचा उल्लेखनीय कामाबद्दल भव्य सत्कार यावेळी करण्यात आला.
वाळेखिंडी ता.जत येथील राज्यस्तरीय शिंदेशाही स्नेहमेळाव्यात बोलताना माजी मंत्री शशिंकात शिंदे,उपस्थित समाज बांधव
Attachments area