जत बचत भवनची इमारत धोकादायक | नवीन इमारत बांधण्याची मागणी

जत,प्रतिनिधी : जत पंचायत समितीकडील जत सांगली मार्गावरील बचत भवन ची आर.सी.सी.बांधकाम केलेली इमारत जीर्ण झाल्याने पडण्याच्या स्थितीत असून प्रशासनाने ही इमारत पाडून या जागेवर प्रशस्त सर्व सोईनेयुक्त असे सभागृह बांधावे अशी मागणी जत शहर वासियातून करण्यात येत आहे.
जत पंचायत समितीने पस्तीस वर्षापूर्वी जत सांगली मार्गावरील श्री.रामराव विद्यामंदिर व ज्युनियर काॅलेजचे समोरील जागेवर भव्य अशी बचत भवनची आर.सी.सी.इमारतीचे बांधकाम केले होते. परंतु सद्या हे संपूर्ण बांधकाम जीर्ण झाल्याने पडण्याच्या स्थितीत आहे. बांधकाम जीर्ण झाल्याने इमारतीच्या आर.सी.सी.छताचे स्लॅब जागोजागी सिमेंट निखळू लागल्याने धोकादायक बनले आहेत.तसेच इमारतीची जागोजागी पडझड झाली आहे.खिडक्यांची तावदाने फुटली आहेत. खिडक्यावरिल सिमेंट काॅन्करिट पडदी निखळून खाली लोंबकळत असलेली दिसत आहे.इमारत जीर्ण झाल्याने या इमारतीच्या बांधकामामध्ये वापरण्यात आलेले स्टील पूर्णपणे गंजून गेले आहे.त्यामुळे ही इमारत केंव्हा पडेल व मोठी दुर्घटना घडेल याचा नेम नाही.ही जीर्ण इमारत भुईसपाट करावी व भविष्यात होणारी मोठी दुर्घटना टाळावी अशी मागणी जत शहरवासियातून करण्यात येत आहे
जत बचत भवनची हिच ती धोकादायक इमारत