जतेत दीड तोळ्याच्या ब्रेसलेटची चोरी

जत,प्रतिनिधी : जत शहरातील गणेश बेकरीचे एंजन्ट नगरसेवक प्रकाश माने रा.रामरावनगर यांचे तीन तोळ्याचे सोन्याचे ब्रेसलेट यल्लमा यात्रेतील किचाच्या कार्यक्रमावेळी चोरीस गेले असल्याचा गुन्हा जत पोलीसांनी दाखल केला आहे.
पोलीसांनी दिलेली माहिती अशी, ता.23 डिंसेबरला यल्लमा देवीच्या किच कार्यक्रमा वेळी माने यांच्या हातातील एक लाख सत्तावीस हजार रूपये किंमतीचे सोन्याचे ब्रेसलेट गर्दीचा फायदा घेत अज्ञान चोरट्यांनी लंपास केले आहे.शुक्रवारी ता.3 रोजी प्रकाश माने यांनी जत पोलीसात फिर्याद दिली आहे.