पाचशे रूपयासाठी एकास काठीने मारहाण

0
Rate Card

जत,प्रतिनिधी : अचकनहळ्ळी ता.जत येथील सिध्देश्वर साहेबराव गणाचार्य यांना उसने पैसे परत न दिल्याच्या कारणावरून मनोहर रंगराव यमगर,रंगराव नागू यमगर रा.अचकनहळ्ळी यांनी काठीने मारहाण केली.याबाबत जत पोलीसांनी गुन्हा नोंदविला आहे.

अधिक माहिती अशी, सिध्देश्वर गणाचार्य यांचे मनोहर यमगर व रंगराव यमगर हे नातेवाईक आहेत.ओळखीने यमगर यांच्याकडून गणाचार्य यांनी दहा हजार रूपये उसने घेतले होते.त्यातील साडेनऊ हजार रूपये त्यांनी परत केले.उरलेले 500 रूपये दे म्हणून मनोहर यमगर व रंगराव यमगर यांनी काठीने मारहाण करून जखमी केल्याचे गणाचार्य यांनी दिलेल्या फिर्यादी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.