मुंचडी खूनप्रकरणाचा उलघडा संशयित दोघे ताब्यात,अनैतिक संबधातून खून : मृत सोलापूर जिल्ह्यातील टेभूर्णीचा

जत,प्रतिनिधी : मुंचडी ता.जत येथील सरकारी गायरान हद्दीतील
तरूणाचा खून करून मृत्तदेह जाळून टाकण्यात आला होता.या प्रकरणाचा उलघडा झाला असून एका महिलेशी असलेल्या अनैतिक संबधातून दोघानी हा खून करून मृत्तदेह जाळल्याचे स्पष्ट झाले आहे.सोलापूर जिल्ह्यातील टेंभूर्णी येथील सुशांत नागनाथ चौधरी वय 30,रा.टेंभूर्णी ता.माढा,जि.सोलापूर यांचा हा मृत्तदेह आहे.याप्रकरणी समाधान दिलीप चौधरी (वय 27,रा.नाळेवस्ती,टेंभूर्णी),व त्यांचा मित्र सागर विष्णू जमदाडे (वय 30,रा.कसबा पेठ,शिवाजी नगर टेंभूर्णी) या दोघाना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
अत्यंत आव्हानात्मक असलेल्या मुचंडी येथील तरुणाच्या खून प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख श्रींकात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक प्रदिप चौधरी व त्यांच्या टीमने पाच दिवसात या खूनाचा छडा लावला.
मुंचडी येथील वनखात्याच्या जागेत अज्ञात तरूणाचा खून करून, मृत्तदेह जाळून टाकण्याचा प्रकार शनिवारी समोर आला होता.ऐन यल्लमादेवी यात्रा कालावधीत हा प्रकार घडल्याने पोलिसही चक्रावले होते.
मृताच्या हातावर गोंदलेले नाव हाच एक पुरावा होता. या घटनेत सशयितांनी तरूणाचा डोक्यात दगड घालून खून करून त्यावर पेट्रोल टाकून मृत्तदेह जाळला होता.त्यातील एक हात अर्धवट जळाला आहे. त्यांच्या उजव्या हातावर आई,B.S. तर सुशांत,ओम अशी अक्षरे लिहिली होती.मृत्तदेहाचा चेहरा पुर्णपणे जळाल्याने ओळख पटण्यास अडचणी ठरत होते.या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला होता.
त्यानुसार त्यांच्या पथकाने शेजारी विजापूर,सोलापूर,नगर,सातारा व सांगली जिल्ह्यातील मिसिंग तक्रारीचा तपास सुरू केला.तपास करित असताना हा मृत्तदेह टेंभूर्णीतील सुंशात चौधरीचा असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली.त्यानुसार संबधित ठिकाणी छापा टाकत खूनातील संशयितांना पोलीसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे पोलीसी खाक्या दाखवित चौकशी केली असता,मयत सुशांत चौधरी यांचे संशयित समाधान चौधरी यांच्याशी संबधित महिलेशी अनैतिक संबध होते.तिला माझ्याकडे पाठवून दे असा तगादा मयत सुंशात यांने लावला होता.त्यातून सुंशातकडून समाधान चौधरी यांची बदनामी केली जात होती.तसेच तुती महिला माझ्याकडे आली नाही,तर तुला व तिला अपमानास्पद वागणूक देऊन तिंचे जीवन उधवस्त करू अशी वारवांर धमकी सुंशात चौधरी देत होता.त्यांचा मनात राग धरून ता.20 डिसेंबर 2019 रोजी समाधान चौधरी यांचे ऑफिसच्या टेरिसवरती सदरबाबत चर्चा चालू होती.त्यावेळी दुसरा संशयित सागर जमदाडे हा आला.त्यावेळी सुंशात चौधरी व समाधान चौधरी यांचेत वादावादी सुरू झाली,त्यात समाधान याने मयत सुंशात चौधरी याला टेरेसवरून खाली ढकलून दिले.मयत सुंशात याला मार लागल्याने तो बेशुध्द झाला.त्यानंतर संशयित सागर जमदाडे व समाधान चौधरी यांनी मयत सुंशात चौधरी यास आय 20 चारचाकी गाडीमध्ये घालून जत,जि.सांगली हद्दीतील मुंचडी गावच्या हद्दीतील निर्जनस्थळी टाकून डोक्यात पुन्हा दगड घातला.त्यांच्या शरिरावरती पेट्रोल टाकून जाळून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने खून केला.कौशल्यपुर्ण पोलीसांनी तपास केला. रात्री उशिराने संशयितांना जत पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
जत तालुका हा सीमावर्ती तालुका असल्यामुळे शेजारी कर्नाटक व सोलापूर जिल्ह्यातून खून करून मृत्तदेह जतच्या हद्दीत टाकली जातात. विशेषतः मुचंडी वनीकरण जागेत असे अनेक प्रकार घडले आहेत.त्यामुळे जत पोलीसांची नेहमीच धावपळ होते.आव्हानात्मक असलेल्या मुचंडी येथील खून प्रकरणाचा पोलीसांनी सुगावा लावल्याने त्यांचे कौतुक होत आहे.या तपासकामी
Attachments area