जाडरबोबलाद | प्राथमिक आरोग्य केंद्राचे भूमीपुजन | आरोग्य सेवेचा प्रश्न मिटणार : सभापती तम्मणगौडा रवीपाटील यांच्या प्रयत्नांना यश

0
Rate Card

जत,प्रतिनिधी :जत तालुक्यातील जाडरबोवलाद येथे मंजूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी चार कोटी 15 लाखाचा निधी मंजूर झाला आहे. या कामाचे भूमीपूजन माजी आमदार विलासराव जगताप,गोपीचंद पडळकर, तुकाराम बाबा,सभापती तम्मणगौडा रविपाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.यावेळी श्री सिद्धेश्वर महास्वामी

यांचे प्रवचन आयोजित केले होते.भूमिपूजन व प्रवचनाला ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. जि.प.चे शिक्षण व आरोग्य सभापती तम्मणगौडा रवीपाटील यांनी पाठपुरावा करून येथे हे आरोग्य केंद्र आणल्याबद्दल गावच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.सभापती पाटील यांनी मिळालेल्या संधीचे सोने करत आरोग्य,शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल केला आहे.तालुक्यातील जनतेला आरोग्य सुविधा  मिळव्यात म्हणून मोठ्या प्रमाणात योजना,शिबिरे राबविली आहे.जाड्डरबोबलाद परिसरातील आरोग्य सेवेसाठी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची गरज होती.त्या अनुषंगाने पाठपुरावा केला.वर्षभरात हे आरोग्य केंद्र जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहे.तालुक्यात मोठ्या प्रमाणात रिक्त असलेल्या वैधकीय अधिकारी,कर्मचारी, व शिक्षकाच्या जागा भरण्यात आल्या आहेत.

अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध होतील असे हे प्राथमिक आरोग्य केंद्र जाड्डरबोबलाद सुरू होणार आहे. त्यांच्या इमारतीचे भूमीपुजन आ.विलासराव जगताप,गोपीचंद पडळकर,हभप तुकाराम महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी जि.प.सदस्य सरदार पाटील,सुनिल पवार,सोमाण्णा हाक्के,विठ्ठल निकम,संजय तेली, संरपच दानम्मा रवीपाटील,उपसंरपच प्रकाश काटे आदी मान्यवर उपस्थित होते.सभापती तम्मणगौडा रवीपाटील यांनी केलेल्या कार्याचा गौरव माजी आमदार विलासराव जगताप,गोपीचंद पडळकर यांनी केला.

जनतेचा विश्वास सार्थ ठरविला

जाड्डरबोबलाद परिसरातील जनतेनी माझ्यावर विश्वास टाकत जिल्हा परिषद सदस्य म्हणून विजयी केले.त्या बंळावर जिल्हा परिषद गटातील सर्वच गावात विकास कामे राबवित विकास केला.जाड्डरबोबलाद येथे गरजेचे असलेले प्रा.आ.केंद्रामुळे

जनतेनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरविला असेही यावेळी सभापती रवीपाटील यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.