संखात मटका एंजन्ट पकडला | अन्य अवैध व्यवसायाला अभय का ?

संख,वार्ताहर : संख ता.जत येथे सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर उमदी पोलीसांनी छापा टाकला.यात गुरूबसू भिमाण्णा बिंळूर रा.संख याला ताब्यात घेत त्यांच्याकडून रोख 650 व मटक्याच्या चिठ्ठ्या जप्त केल्या.संख येथे पोलीस चौकी व पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक असतानाही बेकायदा मटका,जुगार,ऑनलाइन मटका,अवैध वडाप,गांज्या विक्री केली जात आहे. येथे नेमून दिलेल्या कर्मचाऱ्यांना महिन्याला मोठी दक्षिण दिली जात असल्याने त्यांच्याकडून कारवाई होत नाही.
सोमवारी बाजार असल्याने उमदीचे ठाणेदार दत्तात्रय कोळेकर यांनी छापामारी केली.मात्र फक्त एकच मटका एंजन्ट त्यांच्या हाती लागला.बाकीचे अवैध व्यवसायिकांना टिप दिल्याने ते पळाल्याची चर्चा आहे.