जत तालुक्याला न्याय द्यावा | मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे प्रकाश जमदाडे यांची मागणी

0

Rate Card

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत आला आहे.त्यासाठी आपण स्वत: या परिस्थितीवर उपाय योजना करण्यासाठी प्रयत्न केला होता.आता तुम्ही मुख्यमंत्रीपदी असल्याने जत तालुक्यातील जनतेच्या आशा निर्माण झाल्या आहेत.त्यामुळे आपण जतसाठी विशेष लक्ष देऊन दुष्काळ हटवावा,अशी मागणी माजी सभापती प्रकाश जमदाडे यांनी केली आहे.तसे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिले आहे.

महाराष्ट्रात सर्वात मोठा तालुका असून कायम दुष्काळी आहे. सन 2004-05,2008-09,2012,13,2015,2018,या वर्षामध्ये दुष्काळ व यावेळी ऑगष्ट 2019 मध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. सांगली व आसपासच्या गावांना पूर आला.(सन 2009 व 2019) सर्वानां सरसकट नुकसान भरपाई शेतीची, जनावरांची, घराची इतकेच काय निर्वाह भत्ता ही दिला आहे. मग दुष्काळाने कायम होळपरणाऱ्या 50 एकर शेती असणारा शेतकरी ऊसतोडीला जाणाऱ्या तालुक्यातील शेतकऱ्यांना मदत का नाही ?,पूरग्रस्तांना देणेबद्दल आमचे ना नाही पंरतु त्याच प्रमाणे दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांनाही मदत दयावी.आपण कायमच शेतकरी हा केंद्रबिंदू मानला आहे खालील गोष्टीची पूर्तता करून जत तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळवून यावा.विस्तारीत म्हैशाळ योजना जत भाग या योजनेस त्वरीत मान्यता देवून काम चालू करावे.सन 2018 मध्ये पावसाअभावी नुकसान झालेल्या 67 गावातील रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे,त्याची नुकसान भरपाई त्वरीत मिळावी, शेतकरी सन्मान योजनेतून बरेच शेतकरी वंचित आहेत त्यांना त्वरीत लाभ द्यावा.जत तालुक्याचे त्रिभाजन करावे अन्यथा उमदी व माडग्याळ येथे ही अप्पर तहसिल कार्यालय करून स्वतंत्र कर्मचारी नेमावेत.संख अप्पर तहसिलला जोडलेली 13 गावे जत तहसिल कार्यालयाला जोडून सर्वसामान्याची गैरसोय टाळावी.अनेक वर्षापासून संख महावितरणला जोडलेली गैरसोईची 11 गावे जत महावितरण उपविभागाला जोडावीत.जत तालुक्यातील सर्व कार्यालयातील रिक्त पदे (अधिकारी/कर्मचारी) भरावीत.जत ग्रामीण रूग्णालयासाठी सर्व अद्यावत मशिनरी व डॉक्टर, कर्मचारी नेमावेत.जत नगरपरीषदेसाठी रस्ते, गटारी, क्रिडांगण, विरूगंळा केंद्र व प्रशासकीय इमारतीसाठी खास बाब म्हाणून निधी द्यावा.अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या द्राक्ष, डाळींबासाठी 1.00 लाख रू व इतर पिकासाठी 25000/- प्रति हेक्टर नुकसान भरपाई मिळावी.जत तालुक्यात मोठा उद्योग धंदा उभा करून बेरोजगार तरूणांच्या हाताला काम दयावे.कृषी महाविद्यालय चालू करावे जेणेकरून सोलापूर, सांगली जिल्ह्याला त्याचा लाभ होईल.टंचाई काळात पिण्याच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांच्या अधिग्रहीत केलेल्या बोअर व विहरीचे

पैसे त्वरीत दयावेत.कायमच जत तालुक्याला एक न्याय इतर तालुक्याला दुसरा न्याय दिलेला आहे.वरील गोष्टीची पूर्तता करणेसाठी कारवाई करावी,अशीही मागणी करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.