जाल्याळ बु.मध्ये चुलत्याचा निघृन खून I जमीनीच्या वाटणीवरून पुतण्याकडून कृत्य : संशयित दोघे ताब्यात

0

महादेव पुजारी

या विहिरीत मृत्तदेह टाकण्यात आला होता.

.

शिलशिध्द पुजारी

प्रभूलिंग पुजारी

संख,वार्ताहर : जत तालुक्यातील जालिहाळ बुद्रुक येथे पुर्व वैमनष्य व वडिलार्जित जमिनी वाटणीच्या कारणातून चुलत्याचा अपहरण करून दोघा पुतण्याकडून दगडाने ठेचून निघृन खून करण्यात आला. मृतदेहाचे तुकडे करून पोत्यात घालून एका निजृन विहिरीत टाकण्यात आल्याचा प्रकार उमदी पोलीसांनी गुरूवारी उघडीस आणला.महादेव कन्नाप्पा पुजारी (वय 53,रा.जालीहाळ,बु.सध्या कुसूर ता.दक्षिण सोलापूर)असे खून झालेल्या चुलत्याचे नाव आहे.तर सिलीसिद्ध भुताळी पुजारी (वय 30),प्रभुलिंग  ओग्याप्पा पुजारी (वय 21,दोघे,रा.जालिहाळ बुद्रुब)अशी संशयित पुतण्याची नावे आहेत.

Rate Card

याप्रकरणी उमदी पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.संशयित दोघा पुतण्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलीस व घटनास्थंळावरून मिळालेली माहिती अशी,जालीहाळ बुद्रुक येथील खून झालेले चुलते महादेव पुजारी हे सध्या सासरवाडी असलेल्या (कुसुर ता.दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर) येथे राहतात.पुतणे सिलीसिद्ध भुताळी पुजारी व प्रभुलिंग ओग्याप्पा पुजारी हे जालिहाळ बुद्रुक येथे राहतात.

चुलते व पुतण्यात जमिनीच्या कारणावरून यापुर्वी वाद झाले होते.त्यामुळे हा वाद मिटावा म्हणून चुलते व पुतण्यात चर्चा सुरू होती.आठ दिवसापुर्वी चुलते महादेव हे जालीहाळ बु.या गावी आले होते.त्यावेळी जमिनीच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला.घटनेनंतर चुलते महादेव गायब झाले होते.पत्नीने पती महादेव गायब झाल्याचे पोलीसांना कळविले होते.पत्नीने संशय व्यक्त केल्यानुसार पोलीसांनी तपास सुरू केला.सशय व्यक्त केलेल्या पुतणे सिलीसिध्द व प्रभुलिंग यांना ताब्यात घेत पोलीसी खाक्या दाखविला.त्यानंतर त्यांनी खूनाची कबूली देत चुलते महादेव यांना दुचाकीवरून बसवून

जवळच्या तुरीच्या शेतात नेहले.तेथे दोघांनी चुलते महादेव यांचा दगडाने ठेचून खून केला.खून केल्यानंतर मृत्तदेहाचे तुकडे दोन पोत्यात घालून त्याच्या भोवती दगडे बांधून तमाण्णा भोसले यांच्या ओढ्याकडेच्या विहिरीत टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली पोलीसांना दिली.

पोलीसांनी घटनास्थळी पोहचत मृत्तदेह पाण्याबाहेर काढत उत्तरीय तपासणी करून नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

मयत महादेव यांच्या पत्नी सौ.भागिरथी महादेव पुजारी यांनी फिर्याद दिली.

जायांन येथे दोन वर्षापुर्वी अशाच पध्दतीने दोन भावाचा त्यांच्या मुलांचा जमिनीच्या कारणावरून खून केल्याचा प्रकार झाला होता.त्यांनंतर पुन्हा तशाच कारणामुळे खूनाची घटना घडली असून हा तिसरा खून झाला आहे.अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक डी जी कोळेकर यांनी करत आहेत.


Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.