संखच्या उपसंरपचपदी सदाशिव दर्गाकर

संख,वार्ताहर : संख ता.जत येथील उपसंरपचपदी सदाशिव दर्गाकर यांची बिनविरोध निवड झाली.
यावेळी झालेल्या विशेष सभेत संरपच सौ.मंगल रावसाहेब पाटील व ग्रामविकास अधिकारी के.डी नरळे उपस्थित होते.संरपच सौ.पाटील यांनी या निवडीची घोषणा केली.
संख ग्रामपंचायतीवर भाजपचे नेते माजी सभापती आर.के.पाटील यांच्या गटाची सत्ता आहे.पुर्वीचे उपसंरपच एम.आर.जिगजेणी यांचा कालावधी संपल्याने त्यांनी राजीनामा दिला होता.त्यात रिक्त पदावर दर्गाकर यांची निवड झाली.पँनेल प्रमुख आर.के.पाटील म्हणाले, जनतेनी आमच्यावर दाखविलेल्या विश्वासानुसार ग्रामपंचायतीचा कारभार सुरू आहे. लोकहिताला प्राधान्य देत विकास साधण्याचा प्रयत्न करत आहोत.भविष्यात गावचा विस्तार हा दृष्टिकोण आमच्या समोर आहे.निवडणूकीनंतर ठरल्याप्रमाणे उपसंरपचपदी तरूणांना व वेगवेगळ्या सदस्यांना संधी दिली आहे.संरपच मंगल पाटील म्हणाल्या,जनतेनी आपल्याला मोठ्या बहुमतानी विजयी केले आहे.त्यादृष्टीने गेल्या वर्षभरापासून विकास कामे सुरू आहेत.नुतन उपसंरपच दर्गाकर व अन्य सदस्याच्या माध्यमातून गावाचा सर्वोत्तम विकास करण्याचा प्रयत्न करू.
उपसंरपच सदाशिवर दर्गाकर म्हणाले,आमच्या नेत्यांनी दिलेल्या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न करू,नेत्यांना अभिप्रेत असलेला विकास साधण्यासाठी माझा सदैव प्रयत्न राहिल.याप्रंसगी प्रा.आर.बी.पाटील,आय.एम.बिराजदा
संख ता.जत ग्रामपंचायतीच्या सदाशिव दर्गाकर यांची उपसंरपचपदी निवड झाली.यावेळी माजी सभापती आर.के.पाटील,संरपच.मंगल पाटील,आर.बी.पाटील उपस्थित होते.
Attachments area