सोनलगीत वाळू तस्करी करणारा जेसीबी पकडला

0

Rate Card

संख,वार्ताहर : सोनलगी ता.जत येथील ओढा पात्रात वाळु भरून देणारा जेसीबी संखचे अप्पर तहसीलदार प्रंशात पिसाळ यांनी पाळत ठेवून त्यांच्या वरती महसुल व पोलिस विभागातील कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन कारवाई केली.

अप्पर तहसीलदार प्रंशात पिसाळ यांनी दिलेली माहिती अशी की,गुरूवार ता 28/11 रोजी सोनलगी येथे गौणखनिज अवैध उत्खनन वाहतूक नियंत्रण करणाऱ्या अप्पर तहसिल कार्यालय संखचे पथकास, दिनांक ‍16/11 रोजी अवैध वाळू उत्खनन करणारा जेसीबी रवींद्र जाधव यांचे घरासमोर उभा असलेला आढळला.सदर जेसीबी श्री.जाधव यांचे नातेवाईकांच्या मालकीचा असल्याचे चौकशीतून समजले.या जेसीबीद्वारे बोर नदीमध्ये अवैध वाळू उत्खनन होत असल्याबाबत वारंवार तक्रारी प्राप्त होत होत्या.परंतु दिनांक 16/11 रोजी सदर जेसीबी कारवाई करताना पळून गेल्यामुळे पकडता आला नव्हता .सदर जेसीबी दि 28/11 रोजी पथकामार्फत जप्त करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे चालकाने जेसीबी पळवून नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे उमदी पोलिसांच्या मदतीने जेसीबी ताब्यात घेऊन जप्त करण्यात आला. दंडात्मक कारवाईबाबत पुढील आदेश होईपर्यंत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

उमंदी परिसरामध्ये बोरनदी पात्रात अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक करणार्या वाळू माफियांची अजिबात गय केली जाणार नाही.त्यांच्यावर दंडात्मक कारवाई व फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील.वेळ पडल्यास महाराष्ट्र धोकादायक व्यक्ती प्रतिबंध अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात येईल अशी माहिती अप्पर तहसीलदार प्रंशात पिसाळ यांनी दिली. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर,मंडल अधिकारी टी.एस.तळपे,तलाठी एन.डी. सांगोलकर,नितीन कुभांर, एस.डी.बागेळी,राहुल कोळी सह अन्य कर्मचारी होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.