उमदी-को.बोबलाद रस्त्यावर जीवघेणे खड्डे
बालगांव,वार्ताहर : उमदी – को.बोबलाद रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे समजेनासे झाले आहे.या मार्गावरील खड्डे त्वरित दुरुस्त करावेत, अशी मागणी बालगावचे उपसरपंच इरण्णा सारवाड यांनी केली आहे.

सारवाड म्हणाले,उमदी ते को.बोबलाद पर्यंत रस्ता हा पूर्णत खराब झाला आहे. रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता हेच समजणे झाले आहे मुख्य रस्त्याची खड्डयानी चाळण झाली आहे.संपूर्ण रस्ता खड्डेमय बनल्याने दुचाकी व चारचाकी वाहन धारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.विशेषत हळ्ळी ते को.बोबलाद पर्यंत रस्ता पूर्णपणे उखडला आहे. या रस्त्यावर वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागते.मार्गावर वाहतूक अधिक आहे.
उमदी : को.बोबलाद रस्त्यावरील खड्ड्याची मालिका जीवघेणी ठरत आहे.