जतेतील पंचशील पतसंस्थेस नोंदणी प्रमाणपत्र | लवकरचं होणार संस्थेच्या कामकाजास सुरूवात : संजय कांबळे

जत,प्रतिनिधी : येथील पंचशिल नागरी सहकारी पतसंस्था मर्या.जतला नोंदणी परवाना मिळाला.सहाय्यक निबंधक सहकारी संस्था जत यांच्याकडून संस्थेस नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले.
निंबधक कार्यालयाचे सह.अधिकारी एम.एच.कोळी व मुख्य लिपिक एस.एस.शिंदे यांच्याहस्ते पंचशिल पतसंस्थेचे मुख्य प्रवर्तक संजय दर्याप्पा कांबळे यांना पतसंस्थेचे परवाना प्रमाणपत्र देण्यात आले.यावेळी पतसंस्थेचे संचालक संचालक संजय विलास कांबळे,संजय मल्लाप्पा कांबळे,
सोमशेखर कांबळे,प्रशांत ऐदाळे,विनोद कांबळे,सुभाष कांबळे, नितीन गायकवाड,दरीकांत उर्फ भैया कांबळे,प्रसाद भिमराव कांबळे उत्तम रेवण विटेकर उपस्थित होते.यावेळी संजय कांबळे म्हणाले,जत शहरातील व्यापारी,छोटे-मोठे उद्योजक,कामगारासह सामान्य नागरिकांना ठेवी,बचतीबरोबर कर्ज पुरवठा करण्यासाठी ही संस्था काम करणार आहे.पारदर्शी कारभार,अत्याधुनिक सुविधासह सहकारातील सर्वोत्तम सेवा आम्ही या संस्थेच्या माध्यमातून देणार आहोत.लवकरचं संस्थेचे कार्यालय स्थापन करण्यात येणार आहे.कार्यालयाच्या उद्घाटनास केंद्रीय न्यायमंत्री रामदास आठवले व रिपाइचे वरिष्ठ नेते उपस्थितीत लवकरचं होणार असल्याचे कांबळे यांनी सांगितले.
जत येथील पंचशील पतसंस्थेस सहकार विभागाकडून नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले.