मुलाला कामाला पाठविल्याचा जाब विचारणाऱ्या वडीलाला मारहाण
जत,प्रतिनिधी : खोजानवाडी ता.जत येथे मेव्हण्याकडे शिकण्यासाठी असलेल्या मुलाला कामाला का पाठवताय याचा जाब विचारणाऱ्या वडीलाला मेव्हण्याकडून गंभीर मारहाण झाल्याचा गुन्हा जत पोलीसात दाखल झाला.संगाप्पा सिदया कोटलगी वय- 42 असे जखमी वडीलाचे नाव आहे.

पोलीसाकडून मिळालेली माहिती अशी, खोजानवाडी येथे जखमी संगाप्पा यांचा मेव्हणा बसवराज दंडाप्पा तेरदाळ राहतात.त्यांच्यांकडे संगाप्पा यांचा मुलगा शिक्षणासाठी राहत होता.तो दहावी नापास झाल्यानंतर त्याला मेव्हणा बसवराज यांनी कामास लावल्याचे वडील संगाप्पा यांना माहिती होताच त्यांनी मेव्हण्यास जाब विचारला असता त्यांनी संगाप्पास काठीने डोक्यात,माडींवर पाठीत मारहाण करून गंभीर जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अद्याप संशयितास अटक नाही.अधिक तपास हवलदार भोर करित आहेत.