उमदीत द्राक्ष बागेवर कुऱ्हाड | उत्पन्न बुडाल्याने बागायदारांना मानसिक धक्का : मदतीची गरज

0

उमदी,वार्ताहर : तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली बाग दावण्या रोगामुळे वाया गेल्याने उमदी येथील बाळू सुर्यवंशी यांनी महागडी औषध फवारणी करूनही रोग थांबत नसल्याने बागच तोडून टाकण्यास सुरुवात केली आहे.गेल्या पंधवड्यात झालेल्या परतीच्या पावसाने उमदीसह परिसरातील द्राक्ष बागेवर दावण्या,बुरशी, करपा,मणीगळ,घडकुजी आदि रोगाचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे.ऐन फळे बाहेर पडण्याच्या वेळेत पाऊस झाला.परिणामी मोठ्या प्रमाणात दावण्या रोगाचा या भागातील बागायतदारांना फटका बसला आहे.लाखो रुपये खर्च करून उभा केलेल्या बागा तोडून टाकण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे.

गतवर्षी दुष्काळाच्या स्थितीत टँकरने पाणी घालून बागा जगविल्या होत्या.आता पिक येण्याच्या वेळेत पावसाने बागायतदारांचा हातातोंडासी येणारा घास हिरावून घेतला आहे. निसर्गाच्या या प्रकोपाने उमदी परिसरातील शेकडो बागायतदारांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. 

ढगाळ वातावरण व पावसामुळे द्राक्ष बागांत दावण्या,घडकुजी, घड विरघळणे,बुरशी आदि रोगाचा प्रार्दुभाव झाला.दररोज चार ते पाच हजार रुपयाची औषधे मारूनही द्राक्षा वरील रोग थांबत नाहीत.त्यामुळे बागा वाया गेल्या.कर्जे काढून आणलेली औषधे व जगविलेल्या बागाचे उत्पन्न येत नसल्याने बागा तोडून टाकण्याची वेळ आली आहे. अशा रोगामुळे बाग गेलेल्या बाळू सुर्यवंशी या शेतकऱ्यांनी बागच तोडून टाकण्यास सुरुवात केली आहे. 

त्याचबरोबर मलकारी सातपुते व सुरेश पवार यांनीही सांगितले की बागा तोडून टाकण्याशिवाय आमच्यासमोर पर्यायच नसल्याचे सांगितले. 

Rate Card

महागड्या औषधे फवारणी करूनही बागा हातातून गेल्या आहेत. 

 सप्टेंबरमध्ये छाटणी घेतलेल्या शेतकऱ्यांचे जानेवारीमध्ये द्राक्ष विक्रीला जातात. मात्र सध्या घड तयार झाले आहेत. पावसाचे पाणी घडामध्ये पाणी साचल्यास मनी कुजुले आहेत.तसेच जास्त पावसाने मणी गळती झालेली आहेत.दररोज पाऊस होऊ लागल्याने रोगाच्या प्रार्दुभावात वाढच होत आहे.

दररोज पडणा-या धुके,दवमुळे द्राक्षे पिकावर रोगाच्या प्रमाणात वाढ होत आहे. शेतकऱ्यांनी द्राक्ष बागा उभ्या केल्या आहेत. फवारणीसाठी लागणारे महागडी औषधे,रासायनिक खते,मजुरांचा खर्च यामुळे बागायतदार शेतकरी अडचणीत सपडला आहे. खासगी सावकाराकडून घेतलेले कर्ज परत कसे करायचे या विचारात शेतकरी आहेत. शासनाने तातडीने मदत केली नाही तर आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही. असेही बाळू सुर्यवंशी यांनी सांगितले. 

लवकर छाटणी घेतलेल्या द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना याचा फटका जास्त बसला आहे.द्राक्ष बागायतदार शेतकरी दावण्या रोगामुळे डबघाईला आला आहे.शेतक-यांनी स्वतःजवळ बँकेचे व खासगी सावकाराकडून काढलेले  रक्कम आता खर्च झाले आहे. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे बागा काढून टाकल्या जात आहेत.


Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.