उटगीत शेतकऱ्यांची आत्महत्या

0

संख,वार्ताहर : जत तालूक्यातील(लमाणतांडा)उटगी येथील शेतकऱ्याने बँक व खाजगी सावकारकीच्या कर्जाला कटाळून  गळफास घेऊन आत्महत्या केल्यांची घटना घडली आहे.सुभाष धरमण्णां मुचंडी वय असे आत्महत्या केल्याचे नाव आहे.सुभाष धरमण्णां मुचंडी वय 52 रा.उटगी (लमाणतांडा) असे मयत शेतकऱ्यांचे नाव आहे. यापबाबतचा गुन्हा उमदी पोलीसात दाखल झाला आहे.

Rate Card

अधिक माहिती अशी,मयत शेतकरी सुभाष मुचंडी यांनी शेती कामासाठी बँक व खाजगी सावकारांकडून कर्ज काढले होते.मात्र सततचा दुष्काळ यामुळे त्यांना शेतीतून उत्पन्न येत नव्हते.त्यामुळे कर्जे फिटत नसल्याने ते मानसिक विवेंचनात होते.त्यातूनच त्यांनी लिंबाच्या झाडाला धोतराने गळपास लावून आत्महत्या केली,असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.पोलिसात आत्महत्येचा गुन्हा दाखल झाला आहे.त़्यांच्या पाश्चात्त्य आई,पत्नी,मुलगा असे कुंटुब आहे.दरम्यान उमदी पोलीसांनी घटनास्थळी पोहचत मृत्तदेह खाली उतरवून पंचनामा करून शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.