डफळापूरातील प्रा.रणजीत चव्हाण कॉग्रेसचे प्रभावी वक्ते म्हणून उदयास

0

Rate Card

डफळापूर : डफळापूर येथील तेज अँकँडमीचे संचालक प्रा.रणजीत चव्हाण यांनी विधानसभा निवडणूकी पुर्वी कॉग्रेसमध्ये प्रवेश करत विधानसभेच्या प्रचारादरम्यान सुमारे 32 प्रचारसभा घेत आपली उपलब्धता सिध्द केली.

प्रा.चव्हाण यांचे वृक्तृत्व कौशल्य उल्लेखनीय आहे.देश राज्यासह तालुक्यातील अनेक प्रश्नावर प्रभावी विचार मांडले.अनेक गावातील त्यांच्या भाषणाची चर्चा झाली.डफळापूरच्या चव्हाण सरकार घराण्यातील प्रा.चव्हाण हे उच्चशिक्षित व्यक्तीमहत्व आहे.डफळापूरची लोकवर्गणीतून जनकल्याण योजना राबवून त्यांनी ऐन पाणी टंचाईच्या काळात गावकऱ्यांना मोफत पाणी पुरवठा केला होता.जनहिताची तळमळीमुळे ते डफळापूर सह तालुक्यात सतत सक्रीय असतात.तेज अँकँडमी,बुवानंद हिल्स या अँकँडमीतून त्यांनी शेकडो मुलांना नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत.यापुढे कॉग्रेसचे पश्चिम भागातील ताकतवान नेते म्हणून ते भविष्यात पुढे येणार आहेत.

तलावात पाणी उपलब्ध झाल्याने किरकोळ दुरूस्ती करून लवकरचं जनकल्याण योजनेतून गावकऱ्यांना पाणी सुरू करण्याचा त्यांचे प्रयत्न सुरु आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.