डफळापूरात कॉग्रेसला उभारी,भाजपची ताकत कायम

0

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील महत्वाचे गाव असलेल्या डफळापूर येथे कॉग्रेसची नेत्यांची मजबूत फळी असतानासुद्धा भाजपला मतदारांनी ताकत दिल्याचे चित्र आहे.कॉग्रेसचे युवा नेते बाजार समिती संचालक अभिजीत चव्हाण,दिग्विजय चव्हाण,दत्त पतसंस्थेचे चेअरमन बाबासाहेब माळी,विजय चव्हाण, रणजीत चव्हाण यांनी विस्कळीत कॉग्रेसला एकसंग करून उभारी देण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे लोकसभेतील भाजपचा सुसाट वारू रोकत कॉग्रेसला 1927 इतके नंबर एकची मते खेचण्यात यश मिळविले.

Rate Card

भाजपचे युवा नेते परशुराम चव्हाण सर यांनी एकहाती किल्ला लढवत आ.जगताप यांना जवळपास 1500 मते मिळविण्यात यश मिळविले.जेष्ठ नेते संभाजीकाका माळी,पोपटराव पुकळे,मुरलीधर शिंगे,माधवराव चव्हाण, बाळासाहेब शांत आदी मोजक्या नेत्यांची फळी भाजपकडे होती.तर स्वाभिमानी विकास आघाडीचे डॉ.आरळी 894 इतकी मते पडली आहेत.डफळापूर येथे स्वाभिमानी आघाडीचे नेते मन्सूर खतीब व परशूराम चव्हाण सर यांची डफळापूरात एकत्रित आघाडीत आहेत.त्यांच्या दोघाची ताकत पुन्हा वाढल्याचे चित्र आहे.भाजपा व विकास आघाडीचे एकत्रित 2385 इतके मताधिक्य होते.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.