जतेत मतांचा “विक्रम” | कॉग्रेसचे सांवत 35 हजार मतांनी विजयी | भाजपचा दारूण पराभव

जत,प्रतिनिधी : 288 जत विधानसभा मतदार संघात अटीतटीने झालेल्या तिंरगी लढतीत अखेर कॉग्रेस आघाडीचे उमेदवार विक्रमसिंह सांवत यांनी 34,674 अशा मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला.पंधरा वर्षापुर्वीचा कॉग्रेसचा गड पुन्हा कॉग्रेसने भाजपकडून खेचून घेतला.
भाजपला बंडखोरी फटका बसला बंडखोर उमेदवार डॉ.रविंद्र आरळी यांना 28,715 मते घेत भाजपचे पांरपारिक मतदान घटविले.आमदार विलासराव जगताप यांना 52,510 मते मिळाली.
कॉग्रेसचे उमेदवार सांवत यांनी पहिल्या फेरी पासून आघाडी घेत विजय संपादन केला.तुल्यबंळ निवडणूकीकडे राज्याचे लक्ष लागले होते.भाजपच्या जेष्ठ नेत्याकडून विद्यमान आमदार विलासराव जगताप यांच्यावर मोठी नाराजी होती.त्यांनी उमेदवार बदलून देण्याची मागणी केली होती,मात्र भाजपा नेतृत्वाने विद्यमान आ.जगताप यांच्यावर विश्वास दाखवत उमेदवारी दिली होती.तरीही
बंडखोंरानी जत तालुका विकास आघाडी स्थापन करत भाजपचे जेष्ठ नेते डॉ.रविंद्र आरळी यांना मैदानात उतरविले.विरोधात गेलेले मतदार आपल्याकडे खेचण्यात आ.जगताप अपयशी ठरले.दुसरीकडे डॉ.आरळी यांच्यांकडे भाजपचे बंड पुकारलेले नेते,राष्ट्रवादीचे नेते,वंचित आघाडीचा मोठा पांठिबा मिळाला.
आ.जगताप यांच्या प्रचारासाठी अगदी देशाचे गृहमंत्री अमित शहा,कर्नाटकचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रचारासाठी आले होते.तरीही जनतेतील नाराजी दूर करण्यात आ.जगताप अपयशी ठरले.परिणामी भाजपचा जनाधार ढासळला.दुसरीकडे कॉग्रेसचे उमेदवार विक्रमसिंह सांवत यांनी अर्ज भरण्यासाठी केलेली प्रचंड गर्दी व त्यांच्या फेव्हर कायम राखला.प्रत्येक सभेला झालेली गर्दी,आमदारांवर असलेली नाराजी व बंडखोरामुळे भाजपच्या मतविभागनीचा फायदा करून घेण्यात मोठे यश मिळविले.प्रथमपासून सांवत यांना लाभलेला युवकांचा प्रतिसाद व एकसंग कार्यकर्त्याची साथ यामुळे सांवत यांचा विजय सुकर झाला.सर्वाधिक फायदा कर्नाटकातील तुबची-बबलेश्वर योजनेतून पाणी देण्याची कर्नाटकचे गृहमंत्री एम.बी.पाटील यांनी अनेक ठिकाणी केलेल्या सभेतील घोषणेची मदत झाली.विक्रमसिंह सांवत यांच्यासाठी जनतेनीच एकप्रकारे निवडणूक हाती घेतल्याचे चित्र निकालानंतर स्पष्ट झाले.दरम्यान विक्रमसिंह सांवत यांच्या विजयानंतर मतमोजणी केंद्राबाहेर व तालुकाभर फटाक्याच्या जल्लोषात,गुलाल,भंडाऱ्याची उधळन करण्यात आली.जत शहरातील प्रमुख चौकातून विजयी फेरी काढण्यात आली.
फेरीनुसार उमेदवारांना मिळालेली मते
विक्रम सांवत – 1-3819,2-4163,3-4513,4-4652,5-
एकूण मते -87184
आ. विलासराव जगताप (भाजप): 1-2486,2-2227,3-1910,4-2391,5-
11-1961,12-2201,13-3184,14-
डॉ रविंद्र आरळी (स्वाभिमानी आघाडी) : फेरी,मिळालेली मते
1-1326,2-2184,3-1847,4-1057,5-
एकूण मते-28715
फेरी निहान विक्रमसिंह सांवत यांना वाढलेले मताधिक्य
1-1333,2-1936,3-2603,4-2321,5-
इतर उमेदवारांना मिळालेली मते महादेव हरिचंद्र कांबळे – 1521,आनंद शंकर पाटील- 1546,कृष्णदेव धोंडिराम गायकवाड- 580,व्यकटेंश्वर महास्वामीजी-453,विक्रम दादासो ढोणे – 1830,नाटो – 1086
जनतेचा विजय : विक्रमसिंह सांवत
जनतेनी माझ्यावर ठेवलेल्या विश्वास व हातात घेतलेली निवडणूक हा विजय आहे.एकजुट राबलेल्या कार्यकर्त्याचे प्रयत्न महत्वाचे ठरले.पुर्व भागातील सिंचन योजनेपासून वंचित गावांना पाणी देण्यासह तालुक्यातील सर्व गावात सिंचन योजनेतून गावागावात पाणी पोहचवून दुष्काळ संपवत विकास साधणार आहे.
मतदारांनी विकासाला कौल दिला नाही : आ.विलासराव जगताप
जनतेचा कौल मान्य आहे. जनतेनी विकासाला महत्व दिलेले नाही.येत्या पाच वर्षात जनतेला कळून चुकणार आहे.मी मोठ्या संख्येने विकास कामे करूनही जनतेंनी अविश्वास दाखविला.
आम्ही ताकतीने लढलो – डॉ.रविंद्र आरळी
आम्ही ताकतीने लढलो,मतदारांनी दिलेला कौल मान्य आहे.यापुढे आम्हाला सहकार्य केलेल्या कार्यकर्ते पाठबंळ देऊ.विरोधकांना विकासासाठी मदत करू,आम्हाला लाभलेल्या नेते,कार्यकर्त्यांच्या यापुढे कायम राहू.
विजयी उमेदवार विक्रमसिंह सांवत यांनी जंगी मिरवणूक काढली.