रामपूर फाट्यानजिक ट्रकची कंटेनरला धडक,एकजण जखमी

0

Rate Card

जत,प्रतिनिधी : जत सांगली रोडवर्ती रामपूर फाट्यानजिक कंटेनरला ट्रकने मागून धडक दिल्याने एकजण गंभीर जखमी झाला.

जत -सांगली रोडवरील धोकादायक ठरत असलेल्या रामपूर फाट्यानजिक एक कंटेनर थांबला होता.मागून वेगाने येणाऱ्या ट्रक समोरून येणाऱ्या जिपला वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रकची कंटेनरला पाठीमागून धडक झाली.त्यात डाव्या बाजूला बसलेल्या एकाजण गंभीर जखमी झाला.चालकही जखमी झाला आहे.दोघांनाही तातडीने मिरज शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ट्रकचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.चौथ्या मैलापासून रामपूर ओढ्यापर्यत उतार असल्याने वाहने वेगाने येतात त्यात एकाद्या वाहन चालकांनी मध्येच वाहन थांबविल्या,किंवा रस्त्यालगत राहणाऱ्या घरातून एकादा माणूस रस्त्यावर आल्यास अपघात होण्याचा कायम धोका असतो.त्यामुळे अपघातावर नियंत्रण आणण्यासाठी संबधित विभागाने प्रयत्न करावेत अशी मागणी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.