म्हैसाळ योजनेतील वंचित गावे नेमकी किती? | तुकाराम महाराज यांचा सवाल

0

जत,प्रतिनिधी : जत पूर्व भागातील 64 गावे म्हैसाळ योजनेपासून वंचित राहिलेले आहेत पाण्यासाठी या गावांचा गेली 35 वर्षांपासून लढा सुरू आहे.सध्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हा विषय चर्चित आला आहे.प्रचारसभेत राजकीय मंडळी म्हैसाळ योजनेपासून वंचित 67 गावे,कधी 42 गावे तर कधी 48 गावे वंचित असल्याचे राजकीय लोक सांगतात. त्या राजकीय लोकांनी वंचित किती गावे आहेत,याचा सर्वप्रथम खुलासा करावा. विधानसभा निवडणुकीत विजय होणाऱ्या उमेदवाराने 18 महिन्यात म्हैसाळ योजनेच्या प्रश्न सोडवण्यासाठी अंतिम मुदत दिली जाणार आहे.हा प्रश्न नाही सोडवला तर लोकसहभागातून पहिल्या टप्प्याचे काम दरिकोणूर (ता. जत) या गावापासून करणार असल्याची माहिती संख,गोंधळेवाडी श्रीसंत बागडेबाबा मठाचे मठाधिपती होते.होते.ह.भ.प तुकाराम महाराज यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली

Rate Card

म्हैसाळ योजनेला 1982 ला मंजुरी मिळाली आहे.यामध्ये जत,सांगोला मंगळवेढा,कवठेमंकाळ, मिरज या तालुक्यातील गावांचा समावेश करण्यात आला.परंतु गेली 35 वर्षापासून जत पूर्व भागातील गावाला पाणी मिळालेले नाही.

सध्या राजकीय मंडळी या योजनेतील पाण्याचा निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा करून मतदारांना मतदान करण्याचे आव्हान करीत आहे.त्यामुळे या योजनेसाठी यापूर्वी राज्यातील व कर्नाटक राज्याचे आजी माजी मुख्यमंत्री,  उपमुख्यमंत्री, मंत्री यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. राजकीय मंडळी कडून म्हैसाळ योजनेतील वंचित 67 गावे, 42 गावे, 48 गावे समाविष्ट नाहीत,वंचित आहेत असे सांगितले जात आहे. गोंधळेवाडी ते मुंबई मंत्रालय पायी दिंडी काढली होती.त्यावेळी विस्तारीत म्हैसाळ योजनेतून 64 गावे वंचित आहेत. असे पत्र जलसंपदा विभागाने दिले आहे.मग नेमकी किती गावे वंचित आहेत. याचा खुलासा करण्याची गरज आहे.तसेच निवडून येणाऱ्या आमदारांना वंचित गावातील प्रश्न सोडवण्यासाठी 18 महिन्यांची मुदत दिली जाणार आहे. जर प्रश्न नाही सोडला तर लोकसहभागातून दरिकोणूर (ता.जत) येथे कामाला सुरुवात केली जाणार आहे.असेही तुकाराम महाराज म्हणाले   

पत्रकार बैठकीस मानव अधिकार महासंघ पुणे जिल्हा अध्यक्ष संजय धुमाळ,माडग्याळ ग्रामपंचायत सदस्य जेटलिंग कोरे, दत्ता सावळे, गोंधळी समाज संघटनेचे अध्यक्ष सिदराया मोरे आदि उपस्थित होते.

कोणालाही पाठिंबा नाही 

पाणी संघर्ष समितीने या निवडणूकीत कोणाला ही पाठिंबा दिलेला नाही.आपल्या निर्णयावर ठाम आहे.यात कुणीही राजकारण करु नये,आम्ही पाणी आणण्यास प्राधान्य देतो आहोत,असे तुकाराम बाबा यांनी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.