जत तालुक्यात 64.46 टक्के मतदान अटीतटीच्या लढतीत तिंघानाही विजयाची संधी : लक्ष 24 तारखेकडे

0

जत,प्रतिनिधी : जत 288 विधानसभा निवडणूकीसाठी सोमवारी मतदान शांततेत पार पडले.जत शहरातील के एम हायस्कूूूूल जवळील 

केंद्रानजिक झालेली भाजपा-कॉग्रेस कार्यकर्त्यांची किरकोळ वादावादी व अन्य काही किरकोळ घटना वगळता कुठेही अनुसुचित प्रकार घडला नाही.मात्र तालुक्यातील अनेक गावात रवीवारी रात्री व सोमवारी सकाळी आलेल्या पाऊसाने मतदानावर काहीसा परिणाम जाणवला.सकाळी संथ असलेली गती सांयकाळी वाढली होती.पुर्व भागातील तिकोंडीसह काही गावात बोर नदीला पूर आल्याने टँक्टरमधून मतदाराची वाहतूक करावी लागली.तर पाणी मागणीसाठी बहिष्कार टाकलेल्या खंडनाळमध्ये 1519 पैंकी फक्त 149 मतदारांनी हक्क बजावला.अंत्यत चुरशीने झालेल्या तिंरगी लढतीत तालुक्यात 64.46 टक्के मतदान झाले. बनाळी व जत शहरातील एका मतदान केंद्रावर मशीन बंद पडल्याने अर्धातास वेळाने मतदान सुरू झाले.घटलेले मतदान निकालात काय चमत्कार घडविणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.तिंरगी लढतीमुळे निकालाचे चित्र स्पष्ट होत नाही.मात्र तिंघानाही विजयाची संधी असल्याचे अनेक गावातील मतदारांच्या भेटी वरून समोर येत आहे.

Rate Card

निवडणूक निर्णय अधिकारी प्रंशात आवटे यांच्या अनुभवामुळे तालुक्यात मशीन बंद पडणे,अथवा केंद्रावर गोधळ,किंवा मतदान प्रक्रियेत अडथळा आल्याचा प्रकार कुठेही घडला नाही.

निवडणुक प्रक्रिया सुुरळीत व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी विभागीय पोलीस अधिकारी दिलीप जगदाळे  व पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील 282 मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.त्यामुळे तालुक्यात सर्वत्र शांततेत मतदान पार पडले.अपवाद वगळता कोठेही अनुचित प्रकार घडला नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.