निवडणूक यंत्रणा सज्ज जिल्ह्यात 2435 मतदान केंद्रे : 23 लाख 76 हजार 304 मतदार

0

सांगली : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 साठी सांगली जिल्ह्यात दिनांक 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होणार आहे. जिल्ह्यात एकूण 2405 मतदान केंद्रे व 30 सहायक मतदान केंद्रे अशी एकूण 2435 मतदान केंद्रे आहेत. यामध्ये 39 संवेदनशिल मतदान केंद्रे आहेत तर 8 विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येकी 1 सखी मतदान केंद्र असणार आहे. रांगाविरहीत पध्दतीने मतदानासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असून दिव्यांग मतदारांना भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जिल्ह्यात पुरूष मतदार 12 लाख 22 हजार 129, स्त्री मतदार 11 लाख 54 हजार 100, इतर मतदार 75 असे एकूण 23 लाख 76 हजार 304 मतदार आहेत. मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी मतदान केंद्रासाठी नियुक्त केलेली सर्व पथके आज संबंधित मतदान केंद्राकडे आवश्यक त्या सर्व साहित्यासह रवाना होत असून निवडणूक यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

मतदारसंघनिहाय असलेली मतदान केंद्रे, सहाय्यक मतदान केंद्रे व मतदारांची संख्या पुढीलप्रमाणे –

Rate Card

281-मिरज (अ.जा.) – मतदान केंद्रे 296, सहायक मतदान केंद्रे 14 (एकूण 310), मतदार 325626 (पुरूष  167070, स्त्री  158540, इतर  16). 282-सांगली – मतदान केंद्रे 296, सहायक मतदान केंद्रे 6 (एकूण 302), मतदार 323945 (पुरूष  164689, स्त्री  159223, इतर  33). 283-इस्लामपूर – मतदान केंद्रे 284, सहायक मतदान केंद्रे 2 (एकूण 286), मतदार 270746 (पुरूष  138241, स्त्री  132505). 284-शिराळा – मतदान केंद्रे 334, मतदार 291779 (पुरूष  149853, स्त्री  141925, इतर  1). 285-पलूस-कडेगाव – मतदान केंद्रे 283, मतदार 277873 (पुरूष  140129, स्त्री  137739, इतर  5). 286-खानापूर – मतदान केंद्रे 341, सहायक मतदान केंद्रे 3 (एकूण 344), मतदार 322343 (पुरूष  166676, स्त्री  155659, इतर  8). 287-तासगाव-कवठेमहांकाळ – मतदान केंद्रे 291, सहायक मतदान केंद्रे 3 (एकूण 294), मतदार 292848 (पुरूष  150843, स्त्री  141999, इतर  6). 288-जत – मतदान केंद्रे 280, सहायक मतदान केंद्रे 2 (एकूण 282), मतदार 271144 (पुरूष  144628, स्त्री  126510, इतर 6).

सखी मतदान केंद्रे पुढीलप्रमाणे – 281-मिरज – मतदान केंद्र क्र. 192 (आदर्श शिक्षण मंदिर ऑफीसलगतची दक्षिणाभिमुखी पुर्वेकडून खोली नं. 1), 282-सांगली – मतदान केंद्र क्र. 12 ( ग्रामपंचायत कार्यालय वाजेगांव), 283-इस्लामपूर – मतदान केंद्र क्र. 88A (हजरत महंमद सुलेमान उर्दू हायस्कूल ऑफीसजवळ दक्षिणाभिमुखी खोली नं. 4 इस्लामपूर), 284-शिराळा – मतदान केंद्र क्र. 263 (जिल्हा परिषद शाळा उत्तराभिमुखी इमारत पुर्वेकडून खोली नं. 1 चिखलवाडी), 285-पलूस-कडेगाव – मतदान केंद्र क्र. 61 (कडेगांव जिल्हा परिषद शाळा नं. 2 नवीन इमारत पुर्वाभिमुखी खोली नं. 4 दक्षिणेकडील कडेगाव), 286-खानापूर -मतदान केंद्र क्र. 63 (महात्मा गांधी विद्यामंदिर जुने कौलारू इमारत दक्षिणेकडून पश्चिमाभिमुखी खोली नं. 4 विटा), 287-तासगाव-कवठेमहांकाळ –  मतदान केंद्र क्र. 85 (जि.प. मराठी मुलांची शाळा पुर्वेकडून उत्तराभिमुखी खोली क्र. 3 वासुंबे), 288-जत – मतदान केंद्र क्र. 120 (रामराव विद्यामंदिर हायस्कूल मराठी मंदिर आणि ज्युनिअर कॉलेज पूर्वाभिमुखी उत्तरेकडील खोली क्रं. 2 जत).

आदर्श मतदान केंद्रे पुढीलप्रमाणे – 281-मिरज – मतदान केंद्र क्र. 118 (डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय उत्तराभिमुखी नवीन इमारत पश्चिमेकडील खोली क्र. 3), 282-सांगली – मतदान केंद्र क्र. 186 ( राणी सरस्वती कन्या शाळा पेठभाग, मंडई, उत्तराभिमुखी पश्चिमेकडून खोली नं. 1), 283-इस्लामपूर – मतदान केंद्र क्र. 122 (आण्णासाहेब डांगे इंटरनॅशनल स्कूल पुर्व पश्चिम इमारत उत्तराभिमुखी पुर्वेकडून खोली नं. 1 इस्लामपूर), 284-शिराळा – मतदान केंद्र क्र. 167 (जिल्हा परिषद शाळा पाडळी पश्चिमाभिमुखी इमारत उत्तरेकडून खोली नं. 2), 285-पलूस-कडेगाव – मतदान केंद्र क्र. 174 (पंडीत विष्णू दिगंबर पलूसकर बहुउद्देशीय शिक्षण संस्थेची दक्षिणाभिमुखी इमारत पूर्वेकडून खोली नं. 2), 286-खानापूर -मतदान केंद्र क्र. 73 विटा (तलाठी कार्यालय (चावडी)), 287-तासगाव-कवठेमहांकाळ –  मतदान केंद्र क्र. 49 (चंपाबेन वाडीलाल ज्ञानमंदिर, पुर्व पश्चिम उत्तर खोली नं. 2) व मतदान केंद्र क्र. 74 (बेंद्री जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची शाळा खोली नं. 2), 288-जत – मतदान केंद्र क्र. 122 (श्री. रामराव विद्यामंदिर हायस्कूल मराठा मंदिराचे व ज्यु कॉलेज नवीन इमारत उत्तर बाजूची दक्षिणाभिमुख पूर्वेकडून खोली नं. 1).

खाद्यतेलाचा 3 लाख 75 हजाराहून अधिक किंमतीचा साठा जप्त

सांगली : अन्न व औषध प्रशासनातर्फे दिवाळी सणाच्या अनुषंगाने खाद्यतेल, आटा, रवा, मैदा यांचे नमुने घेण्याची मोहिम राबविण्यात आली. यामध्ये खाद्यतेलाचे 6,आटा, रवा, मैदा यांचे 4 व मिठाईचे 2 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. या कारवाईत खाद्यतेलाचा एकूण 3 लाख 75 हजार 970 रूपये किंमतीचा 3 हजार 563 लिटर साठा जप्त करण्यात आला. अशी माहिती सहायक आयुक्त (अन्न) सु. आ. चौगुले यांनी दिली.

अन्न व औषध प्रशासनातर्फे दिनांक 17 ऑक्टोबर रोजी केलेल्या कारवाईत मे. अव्हेन्यू सुपर मार्टस लि. (डी मार्ट) 100 फुटी रोड, सांगली येथील मॅनेजर सिध्दप्पा सनाप्पा हंडेल यांच्याकडून रिफाईन्ड सुर्यफुल तेल, लिबर्टी ब्रँडचे तपासणीसाठी घेवून सदर साठा कमी दर्जाचा असल्याच्या संशयावरून 2 लाख 39 हजार 680 रूपये किंमतीचा सुमारे 2 हजार 42 लिटर साठा जप्त केला. तसेच मे. साहिल ट्रेडर्स, मार्केट यार्ड सांगली येथून राजदिप अरूण मेणकर यांच्याकडून रिफाईंन्ड सुर्यफुल तेल व राईस ब्रॅन नेचर फ्रेश ॲक्टीलाईट जेमिनी ब्रँड चे खाद्यतेलाचे 3 नमुने व 1 आट्याचे नमुने घेवून खाद्यतेलाच्या लेबलवर मेडीकल क्लेम्स केल्याच्या संशयावरून व खाद्यतेलाचा साठा दुय्यम दर्जाचा असल्याच्या संशयावरून 1 लाख 36 हजार 290 रूपये किंमतीचा 1 हजार 521 लिटर साठा जप्त करण्यात आला. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई सहायक आयुक्त (अन्न) सु. आ. चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली व समवेत अन्न सुरक्षा अधिकारी द. ह. कोळी, एस. एस. केदार, एस. व्ही हिरेमठ व नमुना सहायक तानाजी कवळे यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.