हुकूमशाही,हेकेखोर प्रवृत्तीला जनता थारा देणार नाही : डॉ.रविंद्र आरळी

0

जत : तालुक्यातील हुकूमशाही व हेकेखोरपणा याला जनता थारा देणार नाही. आपले प्रश्न ऐकून घेण्यात लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असतील तर त्यांना जागा दाखवलीच पाहिजे. दुसरीकडे काँग्रेसने चालवलेले घराणेशाहीचे राजकारण, यामुळे लोकांच्या मनामध्ये मोठी चीड निर्माण झाली आहे. येणाऱ्या 21 तारखेला दुष्काळी जनता इतिहास घडल्याशिवाय राहणार नाही, असे मत डॉ रवींद्र आरळी यांनी व्यक्त केले.

जत तालुक्यातील उमराणी बिळूर गावांसह प्रचार दौरा केला. यावेळी नेते शिवाजीराव ताड, सुरेशराव शिंदे, प्रकाश जमदाडे,अँड.श्रीपाद अष्टेकर,अँड. प्रभाकर जाधव,अँड. सी आर सांगलीकर, रमेश पाटील, बसवराज धोडमणी,अँड.नानासाहेब गडदे,आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.

Rate Card

डॉ. रवींद्र आरळी म्हणाले, तालुक्यातील दुष्काळाची तीव्रता राज्याच्या इतिहासात नोंद करत असताना भाजप सरकार विविध योजना राबवत असतानाही विद्यमान आमदारांनी कुठे आहे आवाज उठवला नाही. उलट अवैद्य धंद्यासाठी पाच वर्षातून एकदा विधिमंडळात तोंड उघडले. याबाबत दुष्काळ निवारणासाठी स्वतःहून कधीही प्रशासकीय बैठक बोलावले नाही किंवा दुष्काळातील जनता पाण्यासाठी टाकू पडताना याचा जाब एक विद्यमान आमदार म्हणून कधीही विचारलं नाही. हे तालुक्याचे दुर्दैव आहे.तर विरोधी बाकावर असणारा काँग्रेस पक्ष एसी रूम मध्ये बसून दुष्काळाची दाहकता प्रशासनाला दाखवतात. कुठेही रस्त्यावर येऊन आंदोलन, मोर्चा किंवा निवेदन दिले नाही. निवडणुकीच्या तोंडावर लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी स्टंटबाजी करण्यात काँग्रेस नेते मागे पडलेले नाहीत. त्यामुळे वैचारिक पातळीवर आमदार जगताप काँग्रेसचे विक्रम सावंत यांनी जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले. आता भली मोठी आश्वासने देऊन जनतेची मते मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, जनतेनेही मतदानाच्या रुपाने याने त्यांच्या तोंडाला पाणी पोहोचली पाहिजेत, असेही ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.