शहरात पाणी,रस्तेसह प्राथमिक सुविधा न देणाऱ्यांना जागा दाखवा आ.विलासराव जगताप : जतेत प्रचारसभा

0

जत,प्रतिनिधी : जत शहराच्या विकासासाठी अनेक वेळा सत्ताधाऱ्याना आम्ही विनंती केली.मात्र श्रेयासाठी त्यांना शहराचा विकास नको आहे.जत शहराला पाणी पुरवठा करणारा बिरनाळ तलाव पूर्णपणे भरलेला असताना पाण्याचे नियोजन होत नाही.जत शहरातील नागरिकांना आठ दिवसांत एकदा पाणी मिळत आहे.विनाकारण विकतचे पाणी घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.शहरात कचऱ्याचा मोठा प्रश्न असून तो वेळेत उचलला जात नसून तुंबलेल्या गटारीमुळे डेंगू,मलेरिया या रोगाला नागरिक बळी पडत आहेत.जत शहराचे वाटोळे करणाऱ्याच्या हातात काँग्रेस-राष्ट्रवादीचा कारभार आहे.ज्यांना शहराचा चेहरामोहरा बदलणे जमले नाही ते आता विधानसभा निवडणुकीत उभे आहेत.आता जनतेला भूलथापा देण्याचा उद्योग बंद करून शहराचा विकास केला पाहिजे.जे विधानसभेला उभे आहेत त्यांच्या ताब्यात दोन वर्षे नगरपरिषदेचा कारभार असताना जत शहराचा का विकास झाला नाही.याउलट आमदार विलासराव जगताप यांनी म्हैसाळ योजनेतून पाणी दिले.शहरातील  रस्ते दुरुस्तीसाठी आमदार जगताप यांनी दोन  कोटी रुपये मंजूर केले.त्याची कामेसुद्धा सुरू आहेत.तर इकडे विरोधक पावसाचे पाणी पूजन करून लोकांना फसवित आहेत.स्वाभिमानी आघाडीचे डॉ. आरळी यांनी भाजपच्या विरोधात बंड करून आपली पक्षनिष्ठा सिद्ध केली आहे.दोन्ही उमेदवार निवडून येत नाहीत.कोण स्वाभिमानी ,कोण शब्दांचा पक्का व विकास करणार आहे हे जनतेने ओळखले असून आमदार जगताप हेच आता विजयी होणार असल्याचे प्रतिपादन नगरसेवक विजय ताड यांनी केले.

महायुतीचे उमेदवार आमदार विलासराव जगताप यांच्या प्रचारार्थ जत शहरात आयोजित जाहीर सभेत नगरसेवक ताड बोलत होते.

यावेळी नगरसेवक उमेश सावंत म्हणाले की,जत तालुका दुष्काळी असून तालुक्यासाठी सातत्याने विकासासाठी झटणारे नेतृत्व आमदार जगताप यांच्याशिवाय कोणी नाही.आपल्या समोर तीन उमेदवार आहेत.आमदार जगताप यांनी केलेली विकासकामे 

Rate Card

तालुक्यातील प्रत्येक वाडी वस्तीवर दिसत आहेत.गेल्या चाळीस वर्षांपासून म्हैसाळच्या पाण्यासाठी बिळूरच्या नागरिकांनी प्रतिक्षा केली अखेर पाणी मिळाल्याने आमदार,खासदार संजयकाका पाटील यांची  हत्तीवरून मिरवणूक काढली.तालुक्यातील रस्त्यांची कामे पूर्ण होत आहेत. जत शहरातील  नगरपरिषदमध्ये सत्ता काँगेस-राष्ट्रवादीची आहे.मात्र आमदार जगताप यांच्या माध्यमातून आणलेल्या विकास कामाची अडवणूक केली जाते.मुख्यमंत्री नगरोत्थान योजनेतून 2 कोटी रुपयांचा विकास निधी आणला,तर मंत्री सुरेश खाडे यांच्या माध्यमातून 2 कोटी रुपयांचा विकासनिधी आणला.मात्र या कामांना सत्ताधारी विरोध करत आहेत.नगरपालिकेच्या सत्ताधारी मंडळींच्या दुर्लक्षित धोरणाने कचरा,लाईट,स्वछता ही कामे रखडली आहेत.विकासाचा दृष्टिकोन नसणाऱ्याना धडा शिकवण्यासाठी आमदार विलासराव जगताप यांना विजयी करण्याचे आवाहन शेवटी सावंत यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.