जतच्या दुष्काळमुक्तीच्या लढाईमध्ये मीही विक्रम दादांच्या रस्त्यावर उतरणार रोहित आर पाटील : डफळापूर येथे प्रचारसभा

0

डफळापूर,वार्ताहर : विक्रमदादांनी विजयाची खूणगाठ आधीपासूनच बांधली आहे.जतच्या दुष्काळमुक्तीच्या लढाईमध्ये मीही विक्रम दादांच्या बरोबर रस्त्यावरच्या लढाईसाठी तयार आहे.आपण सगळ्यांनी मिळून दादांना निवडून आणुया असे प्रतिपादन रोहित आर.आर.पाटील यांनी केले.

डफळापूर ता.जत येथील प्रचार सभेत ते बोलत होते.

पाटील पुढे म्हणाले,विक्रम दादांनी जि.पमध्ये,डिसीसी बँकेत प्रभावीपणे काम केले आहे.आता विधानसभेत सुद्धा प्रभावीपणे काम करण्याची संधी तुम्ही सर्वांनी द्यायची आहे.माझे जत मधील हे पहिले भाषण असले तरी या भागाशी स्वर्गीय आबांचे घट्ट नाते आहे.जातीयवादी पक्षाना दूर करण्यासाठी सर्वानी एकत्र येऊन विक्रमदादांच्या पाठीशी खंबीरपणे राहण्याची गरज आहे.

Rate Card

पाटील पुढे म्हणाले,युती सरकारने समाजात तेढ निर्माण करून जाती -जातीत भांडणे लावली आहे. शेतकरी,व्यापारी,विद्यार्थी यांना देशोधडीला लावले.छत्रपती शिवरायांच्या नावाने सुरू असलेली कर्जमाफी योजना फसवी आहे.आज सेवा सोसायट्याची स्थिती शेतकऱ्यांना डिव्हीडंटही देऊ शकत नाहीत,इतकी खराब आहे.याला हे शेतकरी विरोधी सरकार जबाबदार आहे. त्यांना हाकलण्यासाठी विक्रमदादांसारखे  प्रभावी नेतृत्वाला निवडून आणा.

आबांच्या विचारराप्रमाने विक्रमदादा  सर्वसामान्यासांठी काम करताना,

समाजातून प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन जातात.प्रत्येकाला न्याय मिळावा यासाठी काम करतात. सध्या परिस्थितीत नितीमान आणि सभ्य राजकारणासाठी विक्रम दादांसारख्या नेतृत्वाची गरज आहे.ते निश्चित या भागाचा विकास करतील याची मी खात्री देतो.त्याचे हात तूम्ही बळकट करा.आदरणीय पवारसाहेब 80 व्या वर्षी या सरकारला पाडण्यासाठी मैदानात आहेत.लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे.सर्व पुरोगामी पक्षांनी मतविभाजन टाळून विक्रमदादांना साथ द्या.राज्यात निश्चितपणे काँग्रेस -राष्ट्रवादी आघाडीचे सरकार येणार आहे.

प्रवीण गायकवाड म्हणाले, विक्रमदादा सावंत यांना निवडून आणणे काळाची गरज आहे.आर आर आंबाच्या जाण्याने राजकारणात नैतिकतेचा ऱ्हास झाला. विचारांशी गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी विक्रमदादांना विधान सभेत पाठवा.

यावी मा.आ. उमाजी सनमडीकर, प्रवीणदादा गायकवाड,अप्पाराय बिराजदार,महादेव पाटील,प्रा.रणजीत चव्हाण,दिग्विजय चव्हाण,अभिजीत चव्हाण,शफीक ईनामदार आदी मान्यवर उपस्थित होते.

डफळापूर ता.जत येथील सभेत बोलताना युवा नेते रोहित आर.आर.पाटील

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.