भष्ट्र व्यवस्थेला बदलण्यासाठी मला साथ द्या : विक्रम ढोणे

0

जत,प्रतिनिधी : तालुक्याच्या जनतेला फसवून निवडणूक जिंकू पाहणाऱ्या व्यवस्थेला यावेळी त्यांची जागा दाखवा,तालुक्यातील जनतेच्या हितासाठी मी कायम उपलब्ध असणाऱा उमेदवार असून माझा विजय जनतेसाठी असेल असे प्रतिपादन अपक्ष उमेदवार विक्रम ढोणे यांनी केले.

त्यांनी बिंळूर,अंकले,जत आदी गावात प्रचार सभा घेतल्या.

Rate Card

ढोणे म्हणाले,जत तालुक्यातील भष्ट्र प्रशासनाला लोकानुभिमूक करण्यात मी कायम कार्यरत असतो.अनेक खात्याचे भष्ट्रचार खणून काढण्याचे काम मी केले आहे.मी जत नगरपालिका, कृषी,महसूल,पंचायत समितीतील अनेक भष्ट्र कारभार विरोधात आंदोलन करून ते समोर आणले आहेत.शासनाचा निधी जनतेसाठी खर्च झाला पाहिजे यासाठी माझा प्रयत्न असतो.जत तालुक्यातील भष्ट्र व्यवस्था,दुष्काळ,रस्ते,शिक्षण,आरोग्य,बेरोजगारी सह सामाजिक सुविधा पुरविण्यात सत्ताधारी आमदार,विरोधी गटही अपयशी ठरले आहेत.पैसे खाण्यासाठी सर्वांचे एकमत होत आहे. निवडणूक आली की विरोध दाखवायचा व निवडून आल्यावर जनतेला लुटण्याचा प्रकार तालुक्यात राजरोसपणे सुरू आहे.याला बदलण्यासाठी यावेळी सुज्ञपणे विचार करून मला मतदान करा,मी कायमस्वरूपी जनतेसाठी काम करेन असे आवाहन शेवटी ढोणे यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.